शिरीष महाराजांचे ३२ लाखांचं कर्ज शिंदेंनी फेडले

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे (वय ३०) यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. त्यांच्यावर असलेले ३२ लाखांचे कर्ज आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेडत कुटुंबावरील कर्जाचं ओझं कमी केला. आमदार विजय शिवतारेंनी शिरीष महाराजाच्या कुटुंबीयांचे सांत्वन करतांना शिंदेंनी पाठवलेली ३२ लाखांची रक्कम देऊ केली.

देऊच्या घरात ५ फेब्रुवारीला शिरीष महाराजांनी गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली होती. या घटनेने परिसरात आणि वारकरी सांप्रदायात खळबळ उडाली होती. ही घटना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना समजली. त्यांनीही या घटनेबाबत दु.ख व्यक्त केलं. ज्या कारणाने महाराजांनी आत्महत्या केली, ते कर्जाचं ओझं आज स्वत. उपमुख्यमंत्री शिंदेंनी उतरवलं.

 

संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज

शिरीष महाराज मोरे यांनी नुकतेच नवीन घर बांधले होते. खालच्या मजल्यावर आई -वडील आणि वरच्या मजल्यावर ते राहत होते. मंगळवारी रात्री वरील खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी साडे आठ वाजल्यानंतरही ते खाली आले नाहीत. म्हणून घरातील लोकांनी वरती रुमजवळ जाऊन दरवाजा वाजवला पण दार उघडले नाही. त्यानंतर दरवाजा तोडला. त्यावेळेस त्यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. देहूत संत तुकाराम महाराजांचे ते अकरावे वंशज होते. वीस दिवसापूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता. एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. ते प्रवचन आणि कीर्तन करायचे.

Leave A Reply

Your email address will not be published.