christmas gift ideas john lewis pf chang coupons jan 2014 eastway lanes coupons philadelphia jalapeno cream cheese coupon steak outback coupon
Thursday, December 1, 2022

शिर्डीतून एका दहशतवाद्याला अटक

- Advertisement -

शिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

शिर्डीतून (Shirdi) एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक आणि पंजाब दहशतवादी विरोधी पथक यांनी संयुक्त कारवाई केली आहे.

- Advertisement -

पंजाबमधल्या राजिंदर या दहशतवाद्याला शिर्डीतून अटक करण्यात आली आहे. १६ ऑगस्टला पंजाब पोलीस दलातील पोलीस निरीक्षकाच्या वाहनाला IED लावून ती स्फोटात उडवण्याचा कट त्याने आखला होता असा आरोप आहे. पंजाब (Panjab) आणि महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) संयुक्त कारवाई करत या दहशतवाद्याला अटक केली आहे.

- Advertisement -

१६ ऑगस्ट रोजी पंजाब पोलिसांच्या पीएसआयच्या गाडीला एलईडी (IED) लावून उडवण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला होता. त्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी आणि महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत राजेंदरला बेड्या ठोकल्या. आरोपीला पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले असून अधिक तपास सुरू आहे. याबाबतची आणखी सविस्तर माहिती लवकरच पाेलिस दल देणार आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या