शिर्डीत तरुणीवर सामूहिक अत्याचार; 5 जणांवर गुन्हा दाखल

0

शिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क

शिर्डी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनाथालयातून निघून गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणीवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना शिर्डी येथे घडली. दरम्यान तिची प्रकृती ठिक नसल्याने तपासणी केल्यावर ती गर्भवती असल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणीच्या जबाबावरून पाच जणांवर पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.

तरुणी अल्पवयीन असताना चार वर्षांपूर्वी एका तिला एक संस्थेत दाखल करण्यात आले होते. तिला ट्रेनिंग दिल्यानंतर तिला नोकरी मिळाली होती. नोकरी करत असलेल्या ठिकाणाहून ती निघून गेली होती. ती तरुणी शिर्डी मंदिर परिसरात एकटीच राहत होती. रात्रीच्या वेळी शिर्डी येथील अनोळखी पाच मुलांनी तिला जेवण देतो, असे सांगून त्यांच्या मंदीर परिसरातील एका रूमवर नेले. त्यानंतर हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबला आणि पाचही संशयितांनी तिच्यावर अत्याचार केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ४ वर्षांपूर्वी शिर्डी येथून पोलिसांनी सुटका करून या तरुणीला नगर येथे एका अनाथ मुलामुलींचा सांभाळणाऱ्या संस्थेत दाखल केले होते. तिला आधार देऊन ट्रेनिंग दिली. ती सज्ञान झाल्यानंतर तिला नोकरी मिळाल्याने ती तिकडे गेली. त्यानंतर तिचा संस्थेशी संपर्क तुटला. ती काम करत असलेल्या ठिकाणाहूनही निघून गेली. त्यानंतर ती शिर्डीत एकटीच राहत होती.

दरम्यान या तरुणीच्या जबाबावरून एमआयडीसी पोलिसांत ५ अनोळखी आरोपींवर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक दीपक पाठक पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.