Sunday, November 27, 2022

शिरागड येथे सप्तशृंगी देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात

- Advertisement -

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

येथुन जवळच असलेल्या शिरागड येथील निवासिनी श्री सप्तशृंगी देवीच्या याञेला सोमवार पासुन सूरुवात होणार आहे. २५ सप्टेंबर रोजी घटस्थापना होईल तर ५ ऑक्टोंबर या दरम्यान दररोज  कीर्तन, भारुड, वही गायन, हवन, पुजापाठ सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

कोळन्हावी व शिरागड दोन्ही गावांच्या तापीनदीच्या उंच टेकडीवर श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. हे दैवत “लहान गड” म्हृणून ओळखले जाते. भाविकांची मनोकामना पुर्ण होऊन सुख समृद्धीची देण देणारे हे दैवत आहे.

जळगाव जिल्ह्यात श्री सप्तशृंगी देवीचे लहान गड म्हणून अख्यायिका अशी आहे की, शिरागड येथे दाट अरण्य होते. तापी नदीच्या काठावर शांत मनमोहक वातावरण, उंच टेकड्या व दऱ्याखोऱ्या असल्याने येथे ऋषी मुनीचे वास्तव्य होते. येथे जगाच्या हितासाठी व कल्याणासाठी जपतप, होमहवन, पुजापाठ ऋषीमुनी करीत होते, याची वार्ता राक्षस दैत्यासुराला समजली असता त्याने येथे हाहाकार माजवला. ऋषीमुनींनी देवीची आराधना केली असता श्री सप्तशृंगी देवी येथे प्रकट झाली व दैत्यासुराशी तिने युध्द केले.

दैत्यासुर जीव वाचविण्यासाठी सैरावैर पळू लागला. सप्तशृंगी देवीने वायुवेगाने त्याचा पाठलाग करून पहाड पोखरून नाशिक येथील गडावर वणी येथे या दैत्यासुराचा वध केला. याठिकाणी तिने विश्रांती घेतल्याने नाशिक येथील वणीचे गड म्हणून उदयास आले. कोळन्हावी व शिरागड या दोन्ही गावाच्या मध्यभागी तापी नदीच्या किनारी सप्तशृंगी देवी विराजमान झाली. तेव्हापासून मोठा गड नाशिक येथील वणीचे गड व शिरागडला लहान गड म्हणून ओळखले जाते. भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून भाविक बाराही महिने देवीच्या दर्शनासाठी येतात.

तापी नदीला पाणी असल्याने कोळन्हावी येथून जाणाऱ्या भाविकांना होळीच्या साह्याने श्री सप्तशृंगी  देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जाता येणार आहे तर साकळी  मनवेल मार्गे शिरागड  गावातुन थेट गडापर्यत रस्ता आहे. तापी नदीला पुर असल्यामुळे धामणगाव फाटा ते तुरखेडा या गावातून गडापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे भाविकांनी कोळन्हावी गावाकडुन यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

संस्थानमार्फत रस्ता, विज व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष शांताराम सांळुखे, सचिव प्रताप सोनवणे, सरपंच योगिता सोनवणे,  उपसरपंच भारती सोळंके, पो.पा.सुधाकर सांळुखे, योगेश सांळुखेसह पदाधिकारी कार्यक्रमासाठी परीश्रम घेत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या