भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर; मित्राच्या मृत्यूने मोदी स्तब्ध

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज जगात खळबळ उडवणारी घटना घडली आहे.  जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे (Former Japanese Prime Minister Shinzo Abe) यांची जपानमध्ये (Japan) एका सार्वजिनक सभेदरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अबे हे भारताचे (India) शुभचिंतक आणि मित्र म्हणून ओळखले जातात. त्यामुळंच अबे यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी भारतात उद्या, ९ जुलै रोजी एक दिवशीय राष्ट्रीय दुखवटा जाहीर (National tragedy declared) करण्यात आला आहे.

पतंप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी शिंजो अबे यांच्या निधनावर प्रतिक्रिया देताना त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढत श्रद्धांजली वाहिली. तसेच उद्या ९ जुलै २०२२ रोजी देशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. याद्वारे जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्याप्रती आपण मनापासून आदरभाव व्यक्त करत आहोत, असंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांच्यावर एका भाषणादरम्यान पश्चिम जपानमधल्या नारा शहरामध्ये गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरानं त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या, या घटनेत गंभीर जखमी झाल्यानं अबे यांची प्रकृती चिंताजनक होती. पण काही तासांनंतर त्यांचं निधन झालं.

या संशयिताने भाषणादरम्यान मागच्या बाजूने गोळी झाडल्याचं सांगण्यात येत आहे. या संशयित हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची बंदूकही जप्त (Gun confiscated) करण्यात  आली आहे. हा हल्लेखोर ४० वर्षांचा आहे. शिंजो अबे यांचे भारताशी घनिष्ट संबंध आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात चारवेळा भारताला भेट दिली आहे. शिंजो अबे ६७ वर्षांचे असून आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.