wine cork diy gifts barnes and noble in store coupon july 2012 918 coupon queen tulsa azalea sands golf coupons thistle and clover village gift shop the gifted wale mp3 download
Thursday, December 1, 2022

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबेंवर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू

- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जपानचे माजी पंतप्रधान व भारताचे मित्र शिंजो आबे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. छातीवर गोळी लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.   ह आबे पश्चिम जपानमधील नारा शहरात भाषण देत होते.  संशयित हल्लेखोराला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

67 वर्षीय शिंजो आबे यांच्यावर शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.30 वाजता हल्ला झाला. आबे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत होते. परंतू उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

एनएचके वर्ल्ड न्यूजने सांगितले की, गोळ्यांचा आवाज ऐकू आला आणि एका संशयिताला घटनास्थळी ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एनएचके वर्ल्ड न्यूजच्या पत्रकाराने सांगितले की, आबे यांच्या भाषणादरम्यान त्यांनी सलग दोन वेळा फायरींगचा आवाज ऐकला.

जपान टाइम्सच्या वृत्तानुसार, शुक्रवारी नारा येथील रस्त्यावर भाषण देत असताना शिंजो आबे यांच्यावर एका व्यक्तीने मागून हल्ला केला. गोळी लागल्याने शिंजो आबे जमिनीवर पडताच त्यांचे सुरक्षा रक्षक लगेच त्यांच्याकडे आले. आबेंच्या मानेतून बरेच रक्त निघाल्याचे सांगण्यात येत होते.

जखमी झाल्यानंतर शिंजो आबे यांना एअर अॅम्ब्युलन्सने एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शिंजो आबे हे जपानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिले. आबे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे ऑगस्ट 2020 मध्ये राजीनामा दिला होता.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या