Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»मुख्यमंत्री पदापेक्षा शिंदेंचं नाव देशात मोठं
    राजकारण

    मुख्यमंत्री पदापेक्षा शिंदेंचं नाव देशात मोठं

    मंत्र्यांच्या विधानाने महायुतीतच वाद पेटला
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 10, 2026No Comments282 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    एकीकडे ऑपरेशन टायगरच्या बातम्यांमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. उद्धव सेनेचे 8 खासदार फोडण्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे हे सध्या दरे गावात आहेत. तिथूनच हे ऑपरेशन राबवण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर उद्धव सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी त्याला तोडीस तोड उत्तर दिले आहे. याच दरम्यान राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या विधानाने महायुतीत शिलगली आहे. त्यांच्या वक्तव्याने महायुतीमधील जुन्या जखमांवरील खपली तर दूर झाली नाही ना याची चर्चा आता होत आहे.

    राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी नायक चित्रपटातील अनिल कपूर यांच्याप्रमाणे काम केले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात पुन्हा सत्ता आली. या सत्तेत एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान आहे. मुख्यमंत्री पदापेक्षा एकनाथ शिंदे हे नाव देशात फार मोठे आहे. त्यांची प्रचंड मेहनत आणि काम या जोरावर सगळी पदे त्यांच्याकडे चालत येतील याविषयी शंका नाही असे कौतुक आबिटकर यांनी केले. ते धाराशिवमध्ये माध्यमांशी बोलत होते.

    मुख्यमंत्री पदापेक्षा शिंदे यांचे नाव मोठे आहे, हे विधान त्यांनी केल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सत्ता स्थापनेवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे या गावी होते. त्यावेळी शिवसेनेला सुद्धा अडीच वर्षांकरीता मुख्यमंत्री पद मिळावे अशी मागणी झाल्याचा दावा करण्यात येत होता. आजही मुख्यमंत्री दरे गावी आहेत आणि त्याचवेळी प्रकाश आबिटकर यांनी मोठे विधान केले आहे. हा निव्वळ योगायोग असला तरी मुख्यमंत्री पद न मिळाल्याची बोचणी यानिमित्ताने पुढे आल्याचा चिमटा विरोधकांनी काढला आहे.

    त्याचवेळी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. एकनाथ शिंदे हे भाकरी फिरवतील या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. काम करेल त्याला संधी मिळणार, भाकरी फिरवली जाणार, असे एकनाथ शिंदे म्हणतात, असे आबिटकर यांनी सांगितले. त्यामुळे मंत्रिमंडळात कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांची विकेट पडलेली असताना आणि काहींची नावं वादात अडकल्यानंतर डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026

    तामिळनाडूत पुन्हा ट्विस्ट : अण्णाद्रमुक पक्षात फुट!

    May 12, 2026

    लाडकी बहीण योजनेने अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले!

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif