शिंदे गटाची थेट केंद्रात वर्णी; इतके मंत्रिपदे मिळणार…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

एकनाथ शिंदे गटाला राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर त्यांच्या पदरी केंद्रातले दोन मंत्रिपदं पडणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये एक कॅबिनेट तर दुसरं राज्यमंत्रीपद असेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, केंद्रात मंत्रिपद देताना ज्येष्ठतेनुसार दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये गजानन कीर्तिकर आणि हेमंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर महिला म्हणून खासदार भावना गवळी यांचं नावही आघाडीवर आहे. त्याचबरोबर शिंदे गटात आलेल्या ज्येष्ठांना राज्यपालपदी नियुक्ती मिळावी म्हणूनही शिंदे गटाची केंद्रात लॉबिंग सुरु असल्याचं कळतंय, असंही सुत्रांनी सांगितलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपद देण्यात येणार आहे. यामध्ये एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद देण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर केंद्रिय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.