Wednesday, August 10, 2022

शिंदे गटाचं नाव ठरलं ! आज घोषणा होण्याची शक्यता

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

राज्यात सत्ता संघर्ष सुरु असून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंच्या गटाचे नाव ठरले आहे. ‘शिवसेना-बाळासाहेब ठाकरे’ असे शिंदे गटाचे नाव ठरवण्यात आले असून, आज दुपारी चार वाजता याची घोषणा होणार आहे. दरम्यान आज दुपारी चार वाजता दीपक केसरकर हे पत्रकार परिषद घेणार असून त्यात ते खुलासा करण्याची करण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

- Advertisement -

.. म्हणून सरकारमधून बाहेर पडलो

फक्त आमदारच नव्हे तर, संघटना, पक्ष आणि चिन्ह देखील आपल्यासोबत जोडण्याचे काम शिंदे करताना पाहायला मिळत आहे. बंडखोरीच्या पहिल्या दिवसांपासून एकनाथ शिंदे म्हणतायत की, खरी शिवसेना आमची आहे कारण हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेणारी सेना आमची आहे. महाविकास आघाडीत शिवसेना नेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व आणि बाळासाहेब यांच्या विचारांशी तडजोड केली म्हणून, आम्ही या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

शिंदे गटाचं नाव ठरलं

आज दुपारी चार वाजता दिपक केसरकर हे पत्रकार परिषद घेणार असून, त्यात एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते. बंडखोरी केलेल्या सर्व आमदारांच्या गटाला शिवसेना- बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या