Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    गुन्हे वार्ता

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    पैसे न दिल्यास दुकान जाळण्याची धमकी : पोलिसांनी केली अटक
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 20, 2026No Comments85 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख पूजा बनसोडे यांना तुर्भे पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. एका भंगार व्यावसायिकाकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि पैसे न दिल्याने मारहाण व दुकानाची तोडफोड केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

    तुर्भे एमआयडीसी परिसरातील भंगार व्यावसायिक सर्वेन्द्रकुमार सिंह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४ जुलै रोजी रमजान शेख नावाचा इसम त्यांच्या दुकानात आला होता. त्याने पूजा बनसोडे आणि सरिता सरवदे यांच्या सांगण्यावरून आल्याचे सांगत दोन लाख रुपये खंडणीची मागणी केली. सिंह यांनी खंडणी देण्यास नकार दिला. त्यानंतर अवघ्या तीन तासांत पूजा बनसोडे, सरिता सरवदे, रमजान शेख, नरेन साकवार आणि हुसेन शेख हे सर्वजण मिळून सिंह यांच्या दुकानावर हल्ला करण्यासाठी धडकले. त्या वेळी सिंह दुकानात उपस्थित नव्हते. या टोळीने कामगार उमेश गौड याला बेदम मारहाण केली, दुकानातील सामानाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आणि “पैसे न दिल्यास दुकान जाळून टाकू” अशी धमकी दिली.

    या घटनेनंतर १५ जुलै रोजी रात्री तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्वरित कारवाई करत शनिवारी मुख्य आरोपी पूजा बनसोडे यांना अटक केली. इतर फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

    आरोपी सरिता सरवदे यांच्यावर यापूर्वी ड्रग्ज प्रकरणात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. २०१८ मध्ये तिच्याकडे शिंदेसेनेचे पदही होते. सद्यस्थितीत पोलिसांमार्फत तडीपारीची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. पूजा बनसोडे आणि सरिता सरवदे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची ही पहिली घटना नाही. गेल्या जून महिन्यात उद्धवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश कोटीवाले यांनी अंमली पदार्थ विक्रीविरोधात तक्रार केली होती. याचा राग मनात धरून कोटीवाले यांच्यावर पोलीस ठाण्याबाहेर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातही पूजा बनसोडे आणि सरिता सरवदे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif