युवानेते किशोर पाटलांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप

0

शिंदाड ता. पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी खुर्द ता.पाचोरा येथील तुळजाई शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयात युवानेते किशोर पाटील यांनी महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धापरीक्षा लेखक चालू घडामोडी पुस्तकाचे लेखक बळीराम हावळे यांच्या पुस्तकाचे स्वखर्चाने पुस्तके आणून वाटप केले.

विद्यार्थ्यांनी जनरल नॉलेजचा अभ्यास करावा व स्पर्धा परीक्षामध्ये सहभाग घ्यावा, असे मत किशोर पाटलांनी व्यक्त केला. पुस्तकाचे वाटप किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर, कर्मचारी, देविदास सावळे सर, सचिन शिंगारे आणि गावातील काही नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.