शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन प्रतिबिंब उत्साहात

0

जळगाव ;- के.सी. ई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन प्रतिबिंब 2022 23 चे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाचे उद्घाटन कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य प्रा. सुरेखा पालवे यांच्या हस्ते तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ए.टी. झांबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापक प्रणिता झांबरे,प्राचार्य अशोक राणे,प्रा.केतन चौधरी,प्रा.निलेश जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वाती चव्हाण यांनी केले.

विद्यार्थ्यांनी विविध हिंदी मराठी अहिराणी व आदिवासी गीतांवर नृत्य सादरीकरण केले. तसेच फॅन्सी ड्रेस स्पर्धेत आदिवासी पेहराव, दाक्षिणात्य व मराठी पेहराव करून वाहवा मिळवली. कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक सुरेखा पालवे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या विविध अंगी सुप्त गुणांना सादरीकरण केल्याने आपल्यातील आत्मविश्वास वृद्धिंगत होतो व आपल्यातील कला सादरीकरणास सक्षम मंच उपलब्ध होतो असे प्रतिपादन केले. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.