जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील महाबळ रोड येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ वाजता ‘शिक्कामोर्तब’ या नाटकाचा विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. हास्य, मनोरंजन आणि दमदार अभिनयाची मेजवानी या प्रयोगातून जळगावकर रसिकांना अनुभवता येणार आहे.
तरंगिणी एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘शिक्कामोर्तब’ या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन प्रमोद विठ्ठल शेलार यांनी केले आहे. नाटकात कांचन पवार, भक्ती रत्नपारखी, स्नेहा पराडकर आणि सागर कारडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी संदेश खेडे, प्रकाशयोजना शीतल तळपदे, संगीत अभिजित पेंढारकर, सूत्रधार गोट्या सावंत, तर निर्मितीप्रमुख महेंद्र खराडे आहेत. विशेष आभार आशीष डी. देशपांडे यांचे आहेत.

विनोदी कथानक, कलाकारांचा उत्स्फूर्त अभिनय आणि रंगमंचावरील मनोरंजनाचा अनोखा अनुभव यामुळे ‘शिक्कामोर्तब’ हा प्रयोग जळगावातील नाट्यरसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रयोगाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या प्रयोगाचे आयोजन विक्रमसिंग पाटील (98920 30101) यांनी केले असून, तिकीट बुकिंगसाठी श्री दत्त मल्टी सर्व्हिसेस, रुपाली हॉटेलसमोर, स्वतंत्र चौक, जळगाव येथे संपर्क साधता येणार आहे. ऑनलाइन बुकिंगची सुविधाही उपलब्ध आहे.
तर लक्षात असू द्या
- प्रयोग : शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६
- वेळ : रात्री ९ वाजता
- स्थळ : छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, महाबळ रोड, जळगाव.


