शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क
पहुर पोलिस स्टेशनचे हद्दीत शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरीचे प्रकार वाढत होते. पहुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी आपल्या सहकाऱ्यांना या चोरीचा छडा लावण्यासाठी सूचना केलेल्या होत्या. याप्रकरणी एका आरोपीस शिताफीने पकडले असुन त्याच्याजवळील केबल जाळून त्यातील काढलेल्या तांब्याच्या तार जप्त केल्या.
पहुर पोलिस स्टेशन येथे फिर्यादी सुधाकर देवराम जाधव व इतर शेतकरी यांच्या दि.21/09/2024 च्या रात्री अज्ञात चोरट्यांनी विहीरीतील मोटारच्या व सोलरच्या केबल चोरुन नेल्याबाबत पहुर पोलिस स्टेशन येथे गुन्हा रजी नं.346/2024 भान्यासं कलम 303(2) प्रमाणे दाखल केलेल्या गुन्ह्याचा सखोल तपास करुन आरोपी शेख मोहम्मद शेख शब्बीर (वय 42, रा. नेरी दिगर ता. जामनेर) यास अटक करत २० हजार रुपये किंमतीचे वायर जाळुन तयार केलेले तांबेच्या तार जप्त करण्यात आल्या आहेत.
सदर गुन्ह्यात सहभागी आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून पहुर पोलिस स्टेशन हद्दीतील शेतकऱ्यांच्या केबल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे..
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक डॅा. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोहेकॅा दिपक सुरवाडे, पोना राहुल पाटील, पोना ज्ञानेश्वर ढाकरे, पोकॅा विनोद पाटील, गोपाल गायकवाड, राहुल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे ईश्वर पाटील, राहुल महाजन यांनी केलेली आहे. सदर शेतकऱ्यांच्या केबल चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने व आरोपीस अटक केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे..