कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या पुण्यस्मरणार्थ राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

0

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क

धी शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन को -ऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी संचलित आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड फाउंडेशन आयोजित कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या पुण्यस्मरणार्थ विद्यार्थी व शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धा दोन गटात असून स्पर्धेसाठी विषय
विद्यार्थी गट – (७ वी ते १० वी) १) कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांचे जीवन व कार्य (2) मोबाईल शाप की वरदान (३) विषमुक्त शेती आणि आरोग्य (४) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव- देशाचा विकास (५) व्यायाम आरोग्यदायी मित्र

शिक्षक गट (प्राथ., माध्य, महाविद्यालयीन) – (१) आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांचे शैक्षणिक सामाजिक व राजकीय कार्य (२) शिक्षक ,पालक व विद्यार्थ्यांमधील संवाद : वास्तवता (३) बदलत्या शैक्षणिक प्रवाहासाठी शिक्षकाची भूमिका (४) पालकांची अपेक्षा व पाल्याची मानसिकता (५) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेतील समस्या आणि उपाययोजना हे विषय असून त्यापैकी एका विषयावर सुवाच्चक्षरातच निबंध लिहावा.

स्पर्धेचे नियम – (१) स्पर्धेत प्रवेश मोफत असून निबंध मराठी, हिंदी, इंग्रजी यापैकी एका भाषेत लिहावा. (२) स्वतंत्र कागदावर स्पर्धकाचे नाव, पत्ता, शाळेचे नाव, फोन नंबर, विषय व गट नंबर लिहून निबंधास जोडावा. (३) शाळेने आपल्या स्तरावर स्पर्धा घेऊन प्रथम पाच निबंध शाळेच्या पत्रासह पाठवावे. (४) निबंध शब्द मर्यादा – विद्यार्थी गट : 500 ते 700 शब्द तर शिक्षक गट : 1000 ते 1500 शब्द आहे. (५) प्रत्येक गटातून तीन क्रमांक निवडले जातील.

पारितोषिके – प्रथम क्रमांक – २००१ रुपये, द्वितीय क्रमांक -१००१ रुपये, तृतीय -७०१ रुपये, उत्तेजनार्थ – ५०१ रुपये ,स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे असेल.

निबंध पाठवण्याचा पत्ता – आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेंदुर्णी तालुका. जामनेर, जिल्हा. जळगाव पिन कोड 42 42 04. प्राचार्य एस. पी. उदार. मोबाईल नंबर 9403833388 या पत्त्यावर दिनांक – १०/१२/२०२२ पर्यंत पोस्टाने अथवा कुरिअरने पाठवावे. व जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन संस्था चेअरमन संजयराव गरुड, सचिव सतीष चंद्र काशीद, सहसचिव दीपक गरुड, फाउंडेशनच्या अध्यक्षा उज्वला काशीद, कार्याध्यक्ष कैलास देशमुख यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी स्पर्धा प्रमुख डी. एन .बडगुजर मोबाईल नंबर 9049394958 व स्पर्धा समन्वयक एल. पी .मोहने मोबाईल नंबर 9130368762 यांच्याशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here