सत्काराने जवान व सेवानिवृत्त भारावले, नगरपंचायतीच्या उपक्रमाचे कौतुक

0

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शेंदुर्णी नगरपंचायतीच्या वतीने सेवानिवृत्त तसेच कार्यरत जवान व सेवानिवृत्त नागरिक यांच्या कार्याचा गौरव म्हणुन त्यांचा शहराच्या वतीने हदय सत्कार करण्यात आला. याविशेष सत्काराने सगळेच भारावले होते. आपल्या गावात सत्कार तो सुद्धा हातात तिरंगा देऊन हे भाग्य मिळाल्याने त्यांनी या उपक्रमाबद्दल नगरपंचायत शेंदुर्णीचे मनापासुन आभार मानले.

शेंदुर्णी नगरपंचायतचे वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा विजयाताई खलसे होत्या. प्रमुख अतिथी म्हणुन माजी उपनगराध्यक्षा व नगरसेविका चंदाबाई अग्रवाल, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, उपनगरध्यक्ष निलेश थोरात, भाजपचे जेष्ठ नेते उत्तमराव थोरात, गोविंद अग्रवाल, प्रकाश झंवर, नारायण गुजर, अमृत खलसे, पंडित जोहरे उपस्थित होते.

प्रारंभी भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  सुरवातीला भारत मातेला स्वातंत्र्य मिळवुन देण्यासाठी जे शेंदुर्णी मधील देशभक्त शहीद झाले त्यांना आदरणीय अर्पण करण्यात आली.  शुभांगी फासे हिने देशभक्तांना अभिवादन करणारे राष्टभक्तीपर गीत सादर केले. या उपक्रमाची संकल्पना पंडित दिनदयालजी उपाध्यक्ष पतसंस्थेचे चेअरमन अमृत खलसे यांनी आपल्या प्रास्ताविकात विषद केली. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्या शहरात नगरपंचायतीचे वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असुन सगळ्यांनी राष्ट्रीय कार्य आहे तेव्हा सहकार्य करण्याचे आवाहन केले. हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी होऊन तिरंगा मोठ्या डौलाने आपल्या घरावर प्रत्येकाने फडकावला पाहिजे असे आवाहन केले.

माजी सरपंच सागरमल जैन, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, भाजपचे जेष्ठ नेते उत्तमराव थोरात, माजी उपसरपंच पंडितराव जोहरे यांनीही आपल्या मनोगतात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्या शहरात देशभक्ती जागृत व्हावी यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन करत सर्व सेवानिवृत्त बांधवांच्या कार्याचा गौरव केला व या उपक्रमाबद्दल नगरपंचायतीस धन्यवाद दिले. सेवानिवृत्त मुख्याध्यापिका विमलताई मांडोळे, सेवानिवृत्त पोस्ट मास्तर अशोक भारुडे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत गावाने आमच्या कार्याची दखल घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले.

याप्रसंगी भाजपचे नेते प्रकाश झंवर, नारायण गुजर, प्रभाकर सपकाळ, तुळशीराम पाटील, कस्तुरचंद जैन, आर.एम.जाधव सर, अरुण जोशी, एकनाथ कोळी, विजय वानखेडे, अंबादास सुर्यवंशी, कडोबा नाना सुर्यवंशी, वामन फासे, संजय ठाकुर, राजेंद्र भारुडे, सुनील शिनकर, डॉ. पंकज सुर्यवंशी तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर, सेवानिवृत्त जवान, अधिकारी, कर्मचारी, नगरपंचायतीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपनगराध्यक्ष निलेश थोरात यांनी तर आभार नगरसेवक सतिष बारी यांनी मानले. शुभांगी फासे हिने गायलेल्या संपुर्ण वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here