घरफोडी करून साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; संशयित अटकेत

0

शेंदुर्णी , लोकशाही न्यूज नेटवर्क 

घरफोडी करून घरातून रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना शेंदुर्णी येथील इस्लामपुरा भागातून उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.

शकीलाबी शेख सईद (वय ४०, रा. इस्लामपुरा, शेंदुर्णी ता. जामनेर) या आपल्या कुटुंबियांसह राहतात. २६ जून रोजी सायंकाळी ८ ते २७ जून रोजी सकाळी ४.३० वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी सुलतान खान सुभान खान याने शकीलाबी शेख यांचे घराचा मुख्य दरवाजा तोडून लोखंडी कपाटात ठेवलेले २ लाख ३० हजार रुपयांची रोकड आणि १ लाख २९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.

याबाबत शकिराबी शेख सईद यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुलतान खान सुभान खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.