शेंदुर्णी परिसरातील हजारो वारकरी पंढरपूरला रवाना

मंत्री गिरिश महाजनांच्या उपस्थितीत रंगला पालखी सोहळा

0

शेंदुर्णी ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शेंदुर्णी शहरातील कळमसरा, लिहे मेणगांव पंचक्रोशीतील विविध गावांतील जवळपास २१०० भाविकांसह त्यांच्या मदतीला स्वयंसेवक व नेते मंडळी भगवान श्री त्रिविक्रम महाराज यांच्या मंदिरापासुन विठ्ठल नामाचा गजर करत दिंडीत वारकरी संप्रदाय भजनी मंडळ महिला भजनी मंडळ सोहळ्यात सहभागी होते.  दिंडी शहरातील विविध मार्गांनी मार्केट कमेटीच्या आवारात गेली. जागोजागी पालखी व वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांनी १५ बसेसला आपल्या सहकाऱ्यांसह रवाना केले.

भगवान श्री त्रिविक्रम महाराज यांच्या मंदिरात गिरिश महाजन यांच्या हस्ते पुजा अभिषेक व आरती करण्यात आली. यावेळी शेंदुर्णी शहर भाजपच्या वतीने गिरिश महाजन यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांनी सांगितले की, जामनेर तालुक्यातील जनतेने ३५ वर्षापासुन मला भरभरुन आशिर्वाद दिले आहे. यंदाच्या वर्षीच नाही तर दरवर्षी आपण आपल्या तालुक्यातील १० हजार वारकऱ्यांना पंढरपुरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी घेऊन जाणार आहे.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते गोविंद अग्रवाल, संजय गरुड, अमृत खलसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कमलाकर पाटील, मार्केट कमेटीचे चेअरमन अशोक भोईटे, कडोबा माळी, कडोबा गुजर, श्रीकांत काबरा, निलेश थोरात, डॉ. पंकज सुर्यवंशी, पंडित जोहरे, स्नेहदिप गरुड, प्रदिप गुजर, राजेंद्र पवार, विजय काबरा, सुधाकर बारी, एकनाथ कोळी, सुनील शिनकर तसेच नगरसेवक, नगरसेविका, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.