मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेंदुर्णी शिक्षण संस्था नुतन इमारत पाया भरणी

अमृत गौरव ग्रंथ प्रकाशन व भव्य शेतकरी मेळाव्याचे शेंदुर्णीत रविवारी आयोजन

0

शेंदुर्णी ता. जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को. ऑप. सोसायटी लि. शेंदुर्णी या शिक्षण संस्थेचा अमृत महोत्सव सोहळा, अमृत गौरव ग्रंथ प्रकाशन व भव्य शेतकरी मेळावा तसेच संस्थेच्या नुतन इमारतीचा पाया भरणी समारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता संस्थेच्या महिला वसतीगृह प्रांगणात आयोजन करण्यात आला असुन समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरिष महाजन हे असणार असुन यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांनी दिली आहे.

याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री दादा भुसे, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, रा. स्व. संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी, सरकारी वकील सुरेंद्र काबरा, आ. मंगेश चव्हाण, आ. अनिल पाटील, आ. राजुमामा भोळे, आ. अमोल जावळे, आ. चंद्रकांत पाटील, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. किशोर पाटील, आ. अमोल पाटील, आ. संजय कुंटे, आ. किशोर दराडे, आ. डॉ. सुधीर तांबे, रविकुमार बथुला, संजय पाटील, राजेश पाटील, तेलंगणाचे आमदार थानिपार्थी भानुप्रसाद राव, माजी नगराध्यक्षा साधना महाजन, जिल्हा परिषद सदस्या सरोजिनी गरुड, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, जैन एरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, मुख्यमंत्री विशेष सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, माजी नगराध्यक्षा विजया खलसे, माजी उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, उपनिबंधक गौतम बलसाणे, अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष हभप. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, उज्वला बेंडाळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन बागुल, शेंदुर्णी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक धांडे, माजी खा. उल्हास पाटील, डॉ. राजेंद्र फडके, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, प्रदिप लोढा, गोविंद अग्रवाल, जितेंद्र पाटील, दगडु पाटील, डॉ. केतकी पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.

या कार्यक्रमास सगळ्यांनी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन तथा स्वगातोत्सुक संजय गरुड, व्हा. चेअरमन भिमराव शेळके, सचिव सागरमल जैन, सहसचिव यु. यु. पाटील तसेच सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.