Monday, August 15, 2022

भगवंताचे नामस्मरण आधुनिक युगात आपले जीवनाचा उद्धार करणार

- Advertisement -

लोकशाही न्युज नेटवर्क 

- Advertisement -

शेंदुर्णी;  चार युगात मनुष्याचे आयुष्य हे कमी.कमी.होत गेले आहे. सध्याच्या कलीयुगात माणसाला भगवंताची भक्ती करण्यासाठी नामस्मरण महत्त्वाचे आहे.भगवंत, संत यांचे  नामस्मरण केले तर आपल्या जीवनाचा उद्धार होण्यास मदतच होते असे प्रतिपादन ह.भ.प.सुनील महाराज आष्टीकर सेलु जि.परभणी यांनी केले.

- Advertisement -

- Advertisement -

शेंदुर्णीत खान्देशातील विख्यात संतकवी भगवत् भक्त वै.भीमराव मामा पारळकर यांच्या प्रेरणेने व स्व.गोविंदराव पारळकर यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू केलेल्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यास गुढी पाडव्यापासुन प्रारंभ झाला यावेळी आपल्या कीर्तनात त्यांनी भगवंताची भक्ती कशी करावी हे सहज सोप्या भाषेत विषद केले. उत्सवाचे यंदाचे हे १०१ वे वर्ष आहे.

सकाळी श्रीराम मंदिरात परंपरेनुसार शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन व राष्ट्रवादी पक्षाचे नेते संजयदाद गरुड व जिल्हा परिषद सदस्या सौ.सरोजिनी गरुड यांच्या हस्ते अभिषेक, पुजा व महाआरती करण्यात आली.श्रीराम मंदिराच्या प्रांगणात सुरू झालेल्या या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात यंदा स्व.गोविंदराव पारळकर यांना भावपुर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली त्यावेळी त्यांच्या आठवणीने सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं होते.

आपल्या सहजसोप्या भाषेत ह.भ.प.सुनील महाराज आष्टीकर यांनी शास्त्रीय ,उपशास्त्रीय गायकीने अभंग रचना यांचे सह संतांचे अभंग व उत्तर रंगात संत चरित्र सांगत भाविकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्यावर श्रीनिवास कुलकर्णी तर हार्मोनियम वर कृष्णा लिंबेकर यांची साथ संगत लाभत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या