शेंदुर्णीत एस.टी.प्रवासाचा लाभ घेणाऱ्या महिलांचा सत्कार

0

शेंदुर्णी ता.जामनेर,

राज्यातील सर्व महिलांना एस.टी.बस मध्ये दि.१७ मार्च २०२३ पासुन ५०% भाड्यात सवलत मिळाली असुन यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन शेंदुर्णीत भाजपच्या नगराध्यक्षा सौ.विजयाताई खलसे नगरसेविका, नगरसेवक, जेष्ठ नेते पदाधिकारी यांनी बस स्थानकावर जाऊन या सेवेचा लाभ घेणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भाजपच्या गटनेत्या सौ.रंजना धुमाळ, नगरसेविका सौ.साधना बारी,नगरसेवक शरद बारी ,भाजपच्या पदाधिकारी तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, पं.दिनदयालजी उपाध्याय पतसंस्थेचे चेअरमन अमृत खलसे ,महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांना यावेळी एस.टी.बस ने प्रवास करणाऱ्या महिलांनी धन्यवाद देत आनंद व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.