शेंदुर्णीत बस स्थानकात कंट्रोलर नसल्याने आवारात होतेय वाहतुकीची कोंडी

0

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

शेंदुर्णी येथील बस स्थानकाचा प्रश्न अजुन किती वर्षे रेंगाळणार आहे माहिती नाही. सध्या बस स्थानक आहे तिथे कंट्रोलर नाही ते आँफिस कधीचेच बंद आहे. यामुळे आवारात अवैध वाहतुकीमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असते.

जामनेर तालुक्यातील मोठे शहर म्हणुन शेंदुर्णी ओळखले जाते. खान्देश, मराठवाडा यांच्या सिमेवर असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात एसटी विविध आगारातील येथे येत असतात. अतिशय कमी जागेत त्यात अवैध वाहतुक करणारे वाहने यामुळे एसटी बसेसला वळण घेतांना दररोजच मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते आहे.

याआधी येथे जामनेर आगारातील एक व्यक्ती कंट्रोलर म्हणुन नियुक्त होते. यामुळे वाहतुकीची कोंडी तेवढी होत नव्हती. प्रवाशांना बसेसची माहिती मिळत होती. निवाऱ्याची व्यवस्था होती. आता कंट्रोलर नाही यामुळे प्रवाशांना गाडीच्या वेळेची माहिती होत नाही. निवारा तर नावालाच आहे. प्रचंड घाणीचे साम्राज्य या ठिकाणी आहे. भर उन्हाळ्यात प्रवाशांना उन्हात उभे रहावे लागत आहे. याठिकाणी लावलेला बोर्ड अतिशय खराब झाला आहे, यामुळे वेळ व गाडीचे नावही कळत नाही.

या ठिकाणी असंख्य रिक्षा, कालीपिली, खाजगी ट्रँव्हल्स यांची संख्या जास्त आहे. गावात येण्यासाठी याच ठिकाणाहुन जावं लागते त्यामुळे प्रवासी, नागरिक, शेतकरी, खाजगी वाहतुक आणि एसटी बसेस यामुळे बहुतांश वेळा वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होत असते काही वेळा बाचाबाची हाणामारी सुद्धा होते.

कंट्रोलर व पोलीस नियुक्त व्हायला हवे..

या ठिकाणी जामनेर आगाराने कंट्रोलर यांची नियुक्ती करावी यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही. विद्यार्थ्यांना शालेय पास मिळेल, प्रवाशांची गैरसोय दुर होईल तसेच वाहतुक पोलिसांचीही नियुक्ती झाली. तर बरेचसे प्रश्न या वाहतुक कोंडीचे मिटण्यासाठी मदतच होईल तेव्हा लवकरात लवकर या ठिकाणी होणारी वाहतुक कोंडी मिटवण्यासाठी संबंधीतांनी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.