Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकार्थ»शेअर बाजारात घसरण, तेजीच्या तुफानाला ब्रेक!
    लोकार्थ

    शेअर बाजारात घसरण, तेजीच्या तुफानाला ब्रेक!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 16, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

    आदल्या दिवसाच्या दमदार तेजीनंतर शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, भारतीय शेअर मार्केटमध्ये मंदीचा जोर पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, शुक्रवारी दिवसाची सुरुवात घसरणीने झाली असून सेन्सेक्स आणि निफ्टीने दिवसाची सुरुवात सुस्तीने केली. सेन्सेक्स सकाळी प्री-ओपनिंगला 216.03 अंकांनी किंवा 0.26 टक्के घसरून 82,314.71 वर उघडला तर, निफ्टी 34.20 अंकांनी म्हणजेच 0.14 टक्के घसरून 25,014.70 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.5 टक्के वधारले तर क्षेत्रीय आधारावर, बँक, आयटी, फार्मा वगळता इतर सर्व निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत.

     

    कुठे तेजी, कुठे घसरण

    देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात सुस्तीने झाली. सेन्सेक्स 200 पेक्षा जास्त अंकांच्या घसरला तर निफ्टी 25,000 च्या पातळीपेक्षा किंचित खाली घसरला. भारती एअरटेल, इंडसइंड बँक, इन्फोसिस सारख्या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली असून आयशर मोटर्स, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय, सिप्ला, कोल इंडिया यांसारख्या समभागांना सर्वाधिक तेजी मिळाली. आयटी, फार्मा, हेल्थकेअर आणि खाजगी बँक निर्देशांकांमध्ये पडझड होताना ग्राहकोपयोगी वस्तू आणि वित्तीय समभागांनी कमाल ताकद दाखवली.

    एकूण चित्र पाहिले तर बाजाराची डोकेदुखी बनलेले टॅरिफ वॉर आणि भू-राजकीय तणाव कमी होताना दिसत आहेत, ज्याचा परिणाम गुरुवारच्या सत्रात दिसून आला. ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच निफ्टीने पुन्हा 25,000 चा टप्पा ओलांडला असून आदल्या दिवसाच्या मोठ्या तेजीत FII नीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली. रोख, निर्देशांक आणि स्टॉक फ्युचर्ससह 16,200 कोटी रुपयांची निव्वळ खरेदी झाली.

    दरम्यान घसरत्या बाजारातही अदानी समूहाच्या शेअर्सनी ताकद दाखवली. सुरुवातीच्या व्यवहारात अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर आणि अदानी ग्रीन एनर्जी 3% हून अधिक वाढीसह व्यवहार करत होते. तर अदनींची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एनर्जी सोल्युशन्स आणि अदानी पोर्ट्समध्येही 1 टक्के हून अधिक वाढ झाली. गुंतवणूकदारांनी या समभागांबद्दल सकारात्मक भूमिका स्वीकारली आहे, जी कालच्या जोरदार तेजीनंतरही कायम राहिली असून अदानी समूहाच्या कंपन्यांवरील गुंतवणूकदारांचा विश्वास अबाधित असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.

     

    शेअर बाजारात तेजीचे वादळ

    याआधी गुरुवारी देशांतर्गत बाजारात सर्वांगीण खरेदी आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून भांडवलाच्या ओघामुळे स्थानिक शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीत राहिला. बीएसई सेन्सेक्स 1,200 अंकांची उसळी घेतली तर एनएसई निफ्टीने सात महिन्यांनंतर पुन्हा 25,000 अंकांचा टप्पा ओलांडला.

    Shear market
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पेट्रोल १८ रुपये, डिझेल २५ रुपयांनी महागण्याची शक्यता

    May 11, 2026

    एलपीजी सिलिंडरच्या नियमात पुन्हा मोठा बदल

    May 7, 2026

    युद्धात पाकिस्तानचे तीनतेरा : स्थिती अत्यंत वाईट

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif