Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकार्थ»सोन्याच्या दरात मोठी तेजी; थेट १९ हजारांची वाढ
    लोकार्थ

    सोन्याच्या दरात मोठी तेजी; थेट १९ हजारांची वाढ

    ग्राहकांसह गुंतवणूकदारांचे लक्ष पुढील दरवाढीकडे
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 23, 2026Updated:August 23, 2026No Comments697 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएस्क्सवर ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या दरात आतापर्यंत सुमारे १९ हजार रुपये प्रति १० ग्रॅमची वाढ झाली आहे. सलग पाचव्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी कायम राहिल्याने ग्राहकांसह गुंतवणूकदारांचेही लक्ष सोन्याच्या पुढील दरवाढीकडे लागले आहे.

    गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. एमसीएस्क्स वर गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात सुमारे ८ हजार रुपये प्रति १० ग्रॅमची वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा भाव १,६२,४३८ रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर पोहोचला. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत सुमारे १३.३० टक्के म्हणजेच १९ हजार रुपयांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सोन्याने यापूर्वी झालेली घसरण भरून काढत पुन्हा विक्रमी पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे.

    सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. शुक्रवारी चांदीच्या दरात १०,६७३ रुपये प्रति किलोची वाढ होऊन भाव २,४८,१२४ रुपये प्रति किलो झाला. त्यामुळे चांदीकडेही गुंतवणूकदारांचा कल वाढताना दिसत आहे.

    सोन्याच्या दरातील तेजीमागे अमेरिकन डॉलरची कमजोरी हे महत्त्वाचे कारण मानले जात आहे. डॉलरचा दर मागील जवळपास तीन महिन्यांच्या तुलनेत घसरल्याने गुंतवणूकदारांचा कल सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढला आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि डॉलरच्या हालचालींचा परिणाम आगामी काळातही सोन्या-चांदीच्या दरावर होण्याची शक्यता आहे. सोन्याचा दर सातत्याने वाढत असल्याने ग्राहकांसाठी खरेदी महागली असून, गुंतवणूकदारांसाठी मात्र सोन्याच्या पुढील वाटचालीकडे उत्सुकता निर्माण झाली आहे.

    २०२६ मध्ये सोन्यात २० टक्क्यांची वाढ

    चालू वर्षात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. या तेजीमुळे सोन्याचा दर यापूर्वी नोंदवलेल्या १,८०,७७९ रुपये प्रति १० ग्रॅम या विक्रमी उच्चांकाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्याचा भाव नवा विक्रम प्रस्थापित करणार का, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif