Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»Shardiya Navratri 2021: तिसरी माळ: नवदुर्गेचे तिसरे रूप देवी चंद्रघंटा
    ताज्या बातम्या

    Shardiya Navratri 2021: तिसरी माळ: नवदुर्गेचे तिसरे रूप देवी चंद्रघंटा

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 9, 2021Updated:October 9, 2021No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    आज शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते. दुर्गेचे तिसरे रूप आणि नाम आहे चंद्रघण्टा  भाविक या दिवशी विधीवत देवी चंद्रघंटाची पूजा करतात. देवीच्या कपाळावर घंटाच्या स्वरुपात अर्धचंद्र सुशोभित आहे ज्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावरील तेज वाढतं. म्हणून त्यांना देवी चंद्रघंटा म्हणतात.

    चंद्रघंटा देवीचे वाहन सिंह आहे. त्यांच्याकडे दहा हात आहेत. देवीच्या हातात कमळाचे फूल, धनुष्य आणि जपमाळ आणि बाण आहेत. उर्वरित हातांमध्ये त्रिशूल, गदा, कमंडल आणि तलवार आहे. आईचा पाचवा हात अभय मुद्रेमध्ये राहतो.  दुर्गेने आपल्या केसात चंद्रकोर माळलेली आहे. जिचा आकार घंटेसारखा भासतो म्हणून चंद्रघंटा. घंटा  हे वाद्य आहे. देवीने रणांगणावर राक्षसांना भीतीने पळवून लावण्यासाठी याचा भयंकर नाद केला ज्यामुळे राक्षस भयभीत होऊन पळू लागल्याचे वर्णन आहे. घंटानाद असुरांच्या पलायनासाठी जसा आहे तसा तो सौम्य मृदू स्वरात देवांच्या आगमनासाठीसुद्धा आहे, म्हणून आपल्या देवघरात शंखाबरोबर घंटा असावी. तिची पूजा करताना आगमनार्थ तू देवानाम गमनार्थच राक्षसाम, असे म्हटले जाते.

    म्हणजेच आमच्या संकल्प सिद्धीसाठी, ध्येयाप्रती पोहोचण्यासाठी मार्गात ज्या दुष्ट शक्ती, वाईट शक्ती शिरकाव करू लागतात, तेव्हा भयाची, धोक्याची घंटा  घालवून देण्याची भयप्रद घण्टा वाजवली गेली पाहिजे. त्या भयप्रद घंटानादात असुरी, वाईट शक्तीचा नि:पात होऊन जे चांगले, मंगल, शुभ आणि कल्याणकारी असेल त्याचे सौम्य मधुर घंटानादात  स्वागतही झाले पाहिजे, म्हणजे दुष्ट शक्तीचा नाश आणि सुष्ट शक्तीचे स्वागत झाले म्हणजे आम्ही उपासक निर्भय होतो. ही निर्भयता म्हणजे देवी कवच.

    देवी चंद्रघंटाची उपासना कशी करावी, मंत्र आणि कथेविषयी जाणून घेऊया –

    देवी चंद्रघंटाची पूजा अशी करावी

    देवी चंद्रघंटाची मूर्ती किंवा प्रतिमा एका पाटावर ठेवा. त्यानंतर विधीवत देवीची पूजा करा. देवीला कुंकू, अक्षता, धूप, पुष्प आणि दूधापासून तयार केलेल्या गोड पदार्थाचं नैवेद्य दाखवा. त्यानंतर देवी चंद्रघंटाच्या आराधनेसाठी “ऊं देवी चंद्रघंटायै नम:” या मंत्राचा जप करा. तसेच, दुर्गा चालीसा आणि दुर्गा आरतीही करु शकता.

    देवी चंद्रघंटाची पूजेचं महत्व

    देवी चंद्रघंटाची पूजा केल्याने सुख-समृद्धी नांदते. तुमचं वैवाहिक जीवन आनंदी राहातं. तसेच, वैवाहिक जीवन आणि विवाहासंबंधीत समस्या सुटतात.

    देवी चंद्रघंटाची कथा –

    हिंदू धर्मग्रंथांनुसार, जेव्हा देव आणि असूर यांच्यात दीर्घकाळापर्यंत युद्ध चालू होते, तेव्हा राक्षसांचा स्वामी महिषासुराने देवतांवर विजय मिळवला. इंद्राचे सिंहासन हिसकावले आणि स्वतः स्वर्गाचा स्वामी बनला. हे पाहून सर्व देव खूप दुःखी झाले. स्वर्गातून हाकलून दिल्यानंतर सर्व देव या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीकडे गेले. तिथे जाऊन सर्व देवांनी असुरांनी केलेल्या अत्याचारांबद्दल आणि इंद्र, चंद्र, सूर्य, वायु आणि इतर देवतांच्या हिसकावलेल्या अधिकारांबद्दल परमेश्वराला सांगितले.

    देवतांनी परमेश्वराला सांगितले की महिषासुराच्या अत्याचारामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर फिरणे अशक्य झाले आहे. मग हे ऐकून ब्रह्मा, विष्णू आणि शिव शंकर खूप क्रोधित झाले. त्याच वेळी तीन देवांच्या तोंडातून एक ऊर्जा बाहेर पडली. देवतांच्या शरीरातून निघणारी ऊर्जा देखील त्या उर्जेमध्ये मिसळली.

    ही ऊर्जा दहा दिशांना पसरु लागली. मग तिथे एका मुलीचा जन्म झाला. भगवान शंकरांनी नंतर त्या देवीला आपला त्रिशूल सादर केला. भगवान विष्णूनेही त्यांना सुदर्शन चक्र दिले. त्याचप्रमाणे सर्व देवांनी देवीला शस्त्रे दिले. इंद्राने आपला वज्र आणि ऐरावत हत्ती देवीला भेट म्हणून दिला.

    सूर्याने आपले तेज, तलवार आणि स्वार होण्यासाठी सिंह प्रदान केला. मग देवी सर्व शास्त्रासह महिषासुराशी युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आली. तिचे विशाल रुप पाहून महिषासुर भीतीने थरथर कापत होता. मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितले. मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षसांच्या सैन्याचा नाश केला. अशाप्रकारे, देवी चंद्रघंटाने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्ध्यान झाल्या.

    देवी चंद्रघंटाची आरती

    जय मां चंद्रघंटा सुख धाम।

    पूर्ण कीजो मेरे सभी काम।

    चंद्र समान तुम शीतल दाती।चंद्र तेज किरणों में समाती।

    क्रोध को शांत करने वाली।

    मीठे बोल सिखाने वाली।

    मन की मालक मन भाती हो।

    चंद्र घंटा तुम वरदाती हो।

    सुंदर भाव को लाने वाली।

    हर संकट मे बचाने वाली।

    हर बुधवार जो तुझे ध्याये।

    श्रद्धा सहित जो विनय सुनाएं।

    मूर्ति चंद्र आकार बनाएं।

    सन्मुख घी की ज्योति जलाएं।

    शीश झुका कहे मन की बाता।

    पूर्ण आस करो जगदाता।

    कांचीपुर स्थान तुम्हारा।

    करनाटिका में मान तुम्हारा।

    नाम तेरा रटूं महारानी।

    भक्त की रक्षा करो भवानी।

     

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Goddess Chandraghanta Shardiya Navratri 2021
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    November 3, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif