Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय»‘…तर आज शरद पवार राष्ट्रपती असते’
    राष्ट्रीय

    ‘…तर आज शरद पवार राष्ट्रपती असते’

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 15, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार आमच्या सोबत आले असते तर या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते, आताही शरद पवारांचं स्वागतच आहे, असं आठवले यांनी म्हटलं आहे, ते जालन्यात बोलत  होते.

    काय म्हणाले आठवले ?  

    शरद पवार आमच्या सोबत आले असते तर ते या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते, आताही शरद पवारांचे स्वागतच आहे. शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते, आजही एकत्र आहेत. अजित पवारांचं म्हणणं एकच होतं, जर तुम्हाला शिवसेना चालते तर बीजेपी का चलात नाही? शरद पवार साहेबांसारखा माणूस आमच्या सोबत आला असता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या प्रगतीसाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी काम केलं असतं. शरद पवार हे देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते.  अजूनही ती वेळ गेलेली नाही, शरद पवार आणि अजित पवार हे जर एकत्र येऊन त्यांचा एनडीएला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवार यांचं स्वागतच आहे, असं आठवले यांनी म्हटलं.

    दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे, त्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तसेच शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना देखील एकत्र यावं लागेल. तरी मला अस वाटतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार नाहीत. आले तर महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा आम्हाला होईल. दोघांना एकत्रीत यायचं असेल तर त्यांनी यावं, पण त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल होणार नाही, असं आठवले यांनी म्हटलं आहे.

     

    ajit pawar Ramdas Athawale SAjit Pawar sharad pawar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    बंडाची तलवार म्यान?

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif