ओळख पटलेल्या मृत व्यक्तीच्या वारसांचा पोलिसांकडून शोध

0

ओळख पटलेल्या मृत व्यक्तीच्या वारसांचा पोलिसांकडून शोध

जळगाव (प्रतिनिधी) – दिनकर नगर, जळगाव येथे राहणारे रामभाऊ जाधव (पूर्ण नाव अज्ञात), वय अंदाजे ४५ वर्षे, यांना गळ्यातील गाठ व पसरलेल्या संसर्गामुळे दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांचे निधन झाले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयताची ओळख पटली असली तरी त्यांच्या कोणत्याही नातेवाइकांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे त्यांच्या वारसाचा शोध घेणे आवश्यक झाले आहे.

मयताचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे –रामभाऊ जाधव (पूर्ण नाव माहीत नाही), वय अंदाजे ४५ वर्षे, राहणार दिनकर नगर, जळगाव. अंगात निळ्या-पांढऱ्या पट्ट्यांचा हाफ शर्ट व फुल पॅन्ट, लाल रंगाची अंडरविअर. उंची ५ फूट ५ इंच, चेहरा लांबट, रंग सावळा, नाक सरळ, दाढी-मिशी पांढऱ्या रंगाची व वाढलेली, गळ्यावर डाव्या बाजूस जखम.

तरी या वर्णनाशी जुळणाऱ्या व्यक्तीला ओळखणारे अथवा त्यांच्या नातेवाईकांनी शनिपेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक : ०२५७-२२२५३४३ / ९८२३८७२९८३ असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.