बिग बॉस १६ फेम “हा” स्पर्धक अपघातात जखमी…!

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

बिग बॉस 16 (Bigg Boss 16) संपून जवळ जवळ १ महिन्याच्या वरती झाला. प्रत्येक स्पर्धक हा बाहेर आल्यावर आपल्या कामात अधिकच व्यस्त झाले आहे. सोबतच शालीन भानोत (Shaleen Bhanot) याला आपण कित्येक मालिकांन मध्ये छोट्या मोठ्या भूमिकेत पाहिले. आणि आता तर शालीन भानोत याला सर्वात मोठा ब्रेक मिळाला आहे. शालीन सध्या ‘बेकाबू’ (Bekaboo) मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शालीन भनोट याची चर्चा सध्या तुफान रंगलेली आहे. पण आता अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. मालिकेच्या शुटिंग दरम्यान सेटवर अभिनेता जखमी झाला आहे. सध्या सर्वत्र शालीन याच्या अपघाताची चर्चा आहे. अभिनेता शुटिंगच्या सेटवर जखमी झाल्याचं कळताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. शालीनच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. मालिकेत एका ॲक्शन सीनचं शूटिंग करत असताना अभिनेता जखमी झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

महत्त्वाचं म्हणजे जखमी झाल्यानंतर देखील शालीन याने मालिकेची शुटींग सुरु ठेवली. जखमी अवस्थेत देखील अभिनेता शूट करत राहिला. शालिन सध्या दिवस-रात्र या मालिकेचं शुटिंग करत असल्याची माहिती मिळत आहे. शालीन आवश्यक तेवढी विश्रांती घेत मालिकेचं शुटिंग करत आहे. महत्त्वाचं म्हणजे सेट झालेल्या घटनेबद्दल शालीन किंवा मालिकेच्या टीमने काहीही सांगितलं नाही. त्यामुळे चाहते अधिक चिंता व्यक्त करत आहेत.

शालीनने सांगितला अनुभव

दरम्यान एका मुलाखतीत अभिनेता म्हणाला, ‘मी पहिल्यांदा जेव्हा बेकाबू मालिकेच्या सेटवर पोहोचलो, तेव्हा प्रचंड घाबरलो होते.. थोडं दडपण होतं… मालिका वेगळी आहे. शिवाय मालिकेतील भूमिका देखील वेगळ्या आहेत. म्हणून मालिकेत रावणाची भूमिका साकारण्यासाठी मला वेगळं वाटत आहे. मालिकेसाठी मी खूप मेहनत घेत आहे. म्हणून प्रेक्षकांनी भरभरून प्रेम द्यावं.. अशी इच्छा आहे…’ असं देखील अभिनेता म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here