जामनेरचे शालिमार थिएटर काळाच्या पडद्याआड..!

सिने रसिकांची थिएटरकडे पाठ : मल्टीप्लेक्सचा अतिरेकपणा

0

 

जामनेर : अनिल शिरसाठ 

 

एकेकाळी जामनेर शहराची शान असलेले सिने रसीकांना सेवा देणारे शालिमार थिएटर अखेर कायमचे बंद झाले आहे. गेल्या पन्नास वर्षांपासुन सिने-रसीक प्रेक्षकांना हिंदी, मराठी अशा विविध चित्रपटांच्या माध्यमातुन सेवा शालिमार थिएटरने सेवा दिली होती. त्या ईमारतीसह जागेची विक्री झाल्यामुळे व देखभालीवर जास्त खर्च होत असल्याने आणि तालुका भरातील सिने प्रेक्षकांच्या अल्प प्रतिसादामुळे व्यवसाय तोट्यात गेल्याने तसेच आर्थिक चणचण या कारणांमुळे ईमारतीवर हातोडा पडला आहे.

 

“गंगा तेरा पाणी अमृत” : पहिला चित्रपट

सन १९ ७२ ला ह्या थिएटरचा शुभारंभ झाला होता. माजी खासदार ईश्वर जैन यांच्या कुटुंबियांची मालकी असलेल्या या शालीमार टॉकीजची सुरुवात मोठ्या दिमाखात झाली होती. “गंगा तेरा पाणी अमृत” हा पहीला चित्रपट लावण्यात आला होता. त्या काळात मनोरंजनासह करमणुकीची साधने खुपच कमी आणि दुर्मीळ असल्याने प्रेक्षकांचा ओघ जास्त होता. जशी जशी प्रगती होत गेली तशी सिने स्रुष्टी ही अत्याधुनिक पद्धतीने प्रगत होत गेली.

 

पन्नास वर्ष थाटात मिरवली शान  

नाटके, कलापथके, तमाशांचे फड अशा ठिकाणी प्रेक्षक रसीकांनी तुंबळ गर्दी अनुभवायला यायची, त्यात चित्रपट गृहे सुरू झाली, त्याच वेळी जामनेर सारख्या ग्रामीण भागातही शालीमार थिएटरची निर्मीती करण्यात आली. आणि पहाता-पहाता पन्नास वर्षे निघुन गेली, मात्र जस-जशी टिव्ही, अँड्रॉइड मोबाईल सारखी अत्याधुनिक-अद्ययावत अशी यंत्रे, विवीध साधने येऊ लागली. कालांतराने मल्टिप्लेक्सचा जमाना आला आणि स्पर्धा वाढायला सुरुवात झाली. याच कारणामुळे पडद्यावरील सिनेमा गृहांना उतरती कळा लागुन त्यांच्यावर कायमचा पडदा ओढण्याची वेळ आली.

 

अनेकांच्या प्रपंचाचे ठरले साधन 

या शालीमार थिएटरच्या माध्यमातून आजवर अनेकांच्या संसाराचा रहाटगाडा व प्रपंच चालायचा या थिएटरचे विशेष म्हणजे सामाजिक, धार्मिक व खास विद्यार्थ्यांना करमणुकीसाठीचे सिनेमा प्रदर्शित व्हायचे. धार्मिक चित्रपट जेव्हा लागायचे त्यावेळी महिला वर्गांनी थिएटर तुडुंब भरायचे. अनेक वाद विवाद या थिएटरने अनुभवले आहेत. तस तशी ह्या चित्रपट गृहांना सिने रसीकांची कमतरता जाणवु लागली. जामनेर शहरामधे ७० ते नव्वदीच्या दशकात केवळ तीन-तीन सिनेमा थिएटर होती. विशेष म्हणजे जवळपास दररोज हे तीनही थिएटर सिने प्रेक्षकांनी गच्च भरून जायचे, मात्र काळाच्या ओघात एक, एक करून विवीध कारणास्तव बंद झाली.

गेल्या पन्नास वर्षा पासुन प्रेक्षकांच्या करमणुकीसाठीचे असलेले एकमेव असे शालीमार थिएटरही बंद झाले, एवढे मात्र खरे की या शालीमार थिएटरच्या बंद होण्यामुळे चिटपट गृहात जाऊनच सिनेमा पहाणाऱ्यांची चांगलीच कुचंबना झाल्याचे जाणवते.

Leave A Reply

Your email address will not be published.