बॉलीवूड मध्ये पदार्पण करण्यापूर्वीच “शहनाज गिल” च नशीब उजळल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहनाज गिल (Shahnaz Gill) हे नाव बिग बॉस १३ (Big Boss 13) च्या सीजन मधून घरा घरात पोहचल. आणि अगदी काही दिवसातच शहनाज ने सर्व प्रेक्षकांच्या मनात एक वेगळाच स्थान निर्माण केला. आता शहनाज सलमान खान (Salman Khan) सोबत त्याच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. तस तिचा हा पहिलाच चित्रपट. किसी का ‘भाई किसी की जान’ हा चित्रपट २१ एप्रिल २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शहनाज गिल हिने पंजाबी चित्रपटांपासून आपल्या करिअरची सुरूवात केली होती.

बिग बाॅसचे घर हे बाॅलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठीचे दार असल्याचे अनेकदा म्हटले जाते. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे बिग बाॅसच्या घरात दाखल होण्याच्या अगोदर शहनाज गिल हिला फक्त पंजाबमध्ये ओळखले जायचे. मात्र, आता संपूर्ण भारतामध्ये शहनाजला ओळखले जाते आणि थेट बाॅलिवूड चित्रपटामध्ये काम करण्याची संधी तिला मिळाली आहे.फक्त किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्येच शहनाज गिल दिसणार नसून शहनाजकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर असून लवकरच निखिल आडवाणी यांच्या चित्रपटामध्ये शहनाज गिल ही महत्वाच्या भूमिकेत असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.