शाहरुख खान उपचारासाठी तातडीने अमेरिकेला रवाना

0

 

मुंबई 

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. काही महिन्यापूर्वी किंग खानला उष्णाघातामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा प्रकृती अस्वस्थामुळे शाहरुखला उपचारासाठी तातडीने अमेरिकेत जावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला डोळ्यांच्या संबंधी त्रास जाणवत आहे. मुंबईत शाहरुख खानवर उपचार करण्यात आले. मात्र, काही अडचणी निर्माण झाल्याने आता शाहरुख खानवर अमेरिकेत तातडीने उपचार करण्यात येणार आहे. मंगळवारीच शाहरुख हा अमेरिकेत रवाना झाला.

 

शाहरुख खान सध्या डोळ्यांवर उपचार घेत आहे. शाहरुख खान उपचारासाठी मुंबईच्या रुग्णालयात गेला. पण ठरल्याप्रमाणे उपचार  झाले नाहीत. शाहरुख 29 जून रोजी रुग्णालयात गेला होता, तेथे उपचार व्यवस्थित होऊ शकले नाहीत. त्यामुळे आता त्याच्यावर अमेरिकेत उपचार करण्यात येणार आहे. वृत्तानुसार, शाहरुख खानच्या डोळ्यांना नेमके काय झाले, त्याच्यावर आता काय उपचार करता येईल, यासाठी अमेरिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.