Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    संपादकीय

    अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 3, 2026No Comments762 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काही शिक्षक शिक्षणाला काळीमा फासण्याचे काम करतात. एक आंबा नासका निघाला की संपूर्ण आळीतल्या आंब्यांना नासवतो, अशातला प्रकार आज बोदवड येथे घडला. अमित खान पठाण, वय ५०, असे या खासगी क्लासेस चालवणाऱ्या नराधम शिक्षकाचे नाव आहे. तो मूळ रहिवासी बोदवड तालुक्यातील जामठी येथील असून, बोदवडपासून जामठी हे नऊ किलोमीटर अंतरावर आहे. त्याची अकॅडमी बोदवड येथे असून, त्या अकॅडमीमध्ये पाचवी ते मॅट्रिकपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे खासगी कोचिंग क्लासेस घ्यायचा. काल सायंकाळच्या सुमारास अमित खान पठाण हा एका काळ्या रंगाच्या कारमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत काही तरुणांच्या निदर्शनास आला. तरुणांना संशय आल्याने त्यांनी त्याची कार अडवली. त्यानंतर त्याला दार उघडण्यास सांगितले. त्यावेळी तो नराधम शिक्षक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. त्याला तरुणांनी पकडण्याचा प्रयत्न केला; पण तो कार सोडून तेथून पसार झाला. तरुणांकडून आता मारहाण होते आहे, या भीतीपोटी तो तेथून पसार झाला. ती अल्पवयीन विद्यार्थिनी त्या कारमध्ये होती आणि तीही मद्यधुंद अवस्थेत होती, असे समजते. ती अल्पवयीन विद्यार्थिनी तालुक्यातील एका खेडेगावातील असल्याचे समजते. हे वृत्त वाऱ्यासारखे बोदवड शहर आणि परिसरात पसरले. मोठा जमाव एकत्र आला. त्या शिक्षकाचे जामठी येथील घर पेटवून दिले, तर बोदवड येथील त्याच्या अकॅडमीसमोरील वाहने जाळली आणि काही वाहनांची तोडफोड केली. त्यावेळी बोदवड पोलीस स्टेशन येथून पोलिसांची कुमक बोदवड व जामठी येथे पोहोचल्यामुळे पुढील अनर्थ टळला. जमाव इतका आक्रमक झाला होता की, काही केल्या पोलिसांना तो आवरणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि पोलिसांनी बळाचा वापर करावा लागला. तेव्हा कुठे जमाव शांत झाला. पोलिसांच्या वतीने जमावाची समजूत घालण्यात आली. त्यानंतर अल्पवयीन विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस स्टेशनमध्ये अमित खान पठाण याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्या नराधम शिक्षक अमित खान पठाण याला अटक करण्यात आली. आज दुपारी आरोपी शिक्षक अमित खान पठाण याला भुसावळ कोर्टात हजर करण्यात येणार होते. अग्रलेख लिहीपर्यंत त्याला किती दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली, हे समजू शकले नाही; पण पोक्सो कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फोर्स जर वेळीच घटनास्थळी दाखल झाला नसता, तर जमावाकडून काय अनर्थ घडला असता, याची कल्पनाच करवत नाही. परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपाने सर्व काही शांत झाले. जमावाची समजूत घालण्यात पोलिसांना यश आले. आरोपीला अटक झालेली आहे. रिमांडनंतर त्याची पूर्णपणे चौकशी करण्यात येईल. परंतु सदर अल्पवयीन विद्यार्थिनी ही त्याच्या खासगी क्लासमधून सोडून दुसरीकडे गेली होती, असे समजते. पण या शिक्षकाने तिला बोलावून घेऊन दारूचे सेवन करून कारमध्ये जामनेर रोडकडे जात होता. तेवढ्यात तरुणांच्या घोळक्याने त्याला पकडले आणि पुढील सर्व खेळ खल्लास झाला. अमित खान पठाण या शिक्षकाचे खासगी क्लासेस पूर्वी जामठीला होते, असे सांगितले जाते. पण जामठीमध्ये असाच काहीतरी प्रकार आढळून आल्याने त्याने आपला क्लास बोदवड येथे सुरू केला होता, असे समजते. त्याच्या क्लासमध्ये पाचवी ते दहावीपर्यंत सुमारे बाराशे ते पंधराशे विद्यार्थी असल्याचे देखील कळते. खासगी क्लासेसच्या फीमधून चांगले उत्पन्न, म्हणजेच त्याला चांगले पैसे मिळत होते. त्या पैशाच्या जोरावरच अशा प्रकारचे काळे कृत्य तो करीत असावा, असा अंदाज आहे. तो दारू प्यायला होता, याबाबत त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.

    आरोपी शिक्षक अमित खान पठाण याचे चारित्र्य काही चांगले नव्हते, असे तेथे प्रत्यक्षदर्शी जमलेल्या जमावाचे म्हणणे आहे. यापूर्वीही असे कृत्य त्याच्या हातून घडले असावे, असा जमावाचा सूर होता. खासगी क्लासेसच्या माध्यमातून मिळणाऱ्या भरपूर पैशामुळे हे त्या शिक्षकास वाममार्गाकडे जाण्यास प्रवृत्त केल्याचे स्पष्ट दिसून येते. शिक्षकाकडे स्वतःच्या मालकीची कार म्हणजे त्यावरून त्याच्याकडे असलेल्या पैशाच्या आवकबाबत कल्पना येते. यापूर्वी अशा काही घटना त्याच्या हातून झालेल्या आहेत का, याचा तपास पोलिसांनी करावा. काही पीडित मुलींनी जर तक्रारी दिल्या, तर पोलीस त्यांची चौकशी करतील. आता हे काम पोलिसांत फिर्याद देण्यावर सर्व काही अवलंबून आहे. ज्या अर्थी त्या अल्पवयीन मुलींना गाडीत बसवून त्यांना दारू देऊन कारमध्ये नेले जाते, त्या अर्थी आरोपी शिक्षक कसा असावा, याचा संशय येतो. त्याने जामठीहून आपली क्लास अकॅडमी बोदवडला केव्हा हलवली आणि ती हलवण्याचे कारण काय, याचा शोध पोलिसांनी घ्यायला हवा. त्यातूनच बरेच काही निष्पन्न होईल. आरोपी हा पन्नास वर्षांचा आहे म्हणजे लग्न वगैरे झालेला असावा. घरचा तो चांगला, वेल सेटल्ड असावा. त्याशिवाय असे काळे कृत्य त्याला सुचणे शक्य नाही. त्याचे शिक्षण काय आहे, तो कसा या खासगी क्लास क्षेत्रात आला, याचाही शोध घ्यावा, म्हणजे त्याचा पूर्वइतिहास समजून येईल. अलीकडे असे प्रकार वाढत आहेत. लातूरचे शिवाजीराव माटेगावकर हे मोठ्या मोठ्या गप्पा मारायचे. त्यांचे खासगी कोचिंग क्लासेस तुफान चालायचे. त्यांनी आपल्या कोचिंग क्लासेसच्या काही ठिकाणी शाखाही ओपन केल्या होत्या. पण नीट परीक्षेत स्वतःचा मुलगा असताना त्याचा स्वार्थ नडला आणि नीट पेपर फोडला. आज तो जेलमध्ये आहे. नीट पेपरची संभाव्य प्रश्नपत्रिका देण्यासाठी तो विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घ्यायचा. विद्यार्थी देखील ते द्यायचे, कारण नीटमध्ये पास झाल्यानंतर आपला नंबर चांगल्या ठिकाणी लागेल. स्वतःच्या मुलासाठी त्यांनी हे काळे कृत्य केले आणि आता बिनभाड्याच्या घरामध्ये जाऊन बसला आहे. तशातला प्रकार हा आरोपी अमीर खान पठाण याचाही आहे. पण अशा नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अनेक विद्यार्थिनींचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या या नराधमास योग्य ते शासन झालेच पाहिजे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!

    October 6, 2026

    नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?

    October 6, 2026

    शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर बँका जबाबदार राहतील!

    October 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif