Monday, September 26, 2022

सुप्रीम कॉलनी येथे सेवालाल महाराज चौकाचे अनावरण

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

मागील अनेक वर्षापासून बंजारा समाज हा जळगाव शहरांमधील सुप्रीम कॉलनी या ठिकाणी वास्तव्यास आहे पण पाहिजे तेवढा सोयीसुविधांपासून बंजारा समाज वंचित आहे. आज जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांच्या हस्ते सेवालाल महाराज चौकाचे अनावरण करून समाजाला एक मानाचे स्थान यांनी प्राप्त करून दिले आहे, त्याबद्दल राजुमामा भोळे यांचे सर्वदूर समाजाच्या वतीने कौतुक केले जात आहे. तसेच राजू मामानी शब्द दिला आहे की, येणाऱ्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी सेवालाल महाराज यांचा पुतळा देखील ते लावणार आहे.

- Advertisement -

- Advertisement -

तसेच समाजाच्या विकासासाठी अनेक समाज उपयोगी कार्यक्रम शासनाच्या सेवासुविधा समाजाच्या प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याचा त्यांचा विचार आहे व याची जबाबदारी त्यांनी गोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली. गोड सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने मा. राजूमामा भोळे यांना बंजारा समाजाची ओळख असलेला मानाचा सेला घालून मामांचा प्रमुख सत्कार करण्यात आला व ललित भाऊ कोळी यांच्या वतीने लाडू वाटप करून समाज बांधवांनीचे तोंड गोड करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून गणेश सोनवणे नगरसेवक, ललित कोळी, सुभाष जाधव गट विकास अधिकारी, चेतन जाधव गोर सेना जिल्हा सचिव मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सिताराम चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये यासोबतच माधव राठोड, ज्ञानेश्वर राठोड, सुनील चव्हाण, सागर राठोड, मनोज जाधव, सुनील नाईक, सुरेश राठोड, अनिल राठोड, विशाल चव्हाण, अभिजीत चव्हाण, निलेश राठोड, सुदाम राठोड, श्याम राठोड, सनी राठोड, प्रशांत चव्हाण, किशोर चव्हाण, लहू चव्हाण, संतोष चव्हाण, बालचंद राठोड , राहुल राठोड, अभिषेक राठोड हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या