Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»हवामान»महाराष्ट्रात पुढील ५ दिवस उष्णेतची तीव्र लाट येणार
    हवामान

    महाराष्ट्रात पुढील ५ दिवस उष्णेतची तीव्र लाट येणार

    तापमान ४२ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता : अलर्ट जारी
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 13, 2026No Comments273 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यात तापमानाचा पारा वाढत असून उन्हाचा चटका जाणवत आहे. काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आला असून उर्वरित ठिकाणी उष्ण दमट हवामान असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील ५ दिवस घराबाहेर पडणं टाळा असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. आज मुंबई, पुणे, कोकणात तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

    हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ५ दिवस राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० शी पार करण्याची शक्यता आहे. काल अकोल्यात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस इतका होता. अकोला जिल्हा राज्यातील सर्वाधिक उच्चांकी तापमान असणारं शहर ठरलं आहे. आज अकोल्यातील तापमान ४२ अंशावर गेलं आहे.

    आज मुंबई, पुणे, ठाणे, मराठवाडा, विदर्भ, कोकणात सूर्य आग ओकत असून तापमानात वाढ झाली आहे. नांदेडमध्ये तापमान ४० अंश सेल्सियस इतके आहे, नाशिकमध्ये ४१ अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमान आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्याचे तापमान ४२ अंशावर जाण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसात तपमान वाढणार असून विदर्भातील जिल्ह्याना उन्हाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील ५ दिवस विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे, तसेच आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, आणि उन्हापासून बचावासाठी योग्य ती काळजी घ्या असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

    नांदेड जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून मोठया प्रमाणात उष्णतेत वाढ झाल्याने या वाढत्या उष्णतेचा फटका केळी बागांना बसत आहे. केळीच्या बागा करपून जात आहेत. अर्धापुर, मुदखेड नांदेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. तापमान ४० अंशापर्यंत पोहचल्याने केळी बागांना या वाढत्या उष्णतेचा मोठा फटका बसत आहे.परिणामी पाण्याची पातळी देखील खालावली असल्याने केळीला पाणी कमी पडत आहे.त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याच चित्र पहायला मिळत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif