सलग सातव्यांदा गुजरात मध्ये कमळची बाजी…

0

 

गुजरात निवडणूक, लोकशाही न्यूज नेटवर्क:

भाजपाने (BJP) ऐतिहासिक कामगिरी केली असून १८४ पैकी १५८ जागा जिंकण्याच्या मार्गावर आहे. काँग्रेसचा (Congress) मात्र दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला फक्त १६ ते २० जागांवर विजय मिळण्याती शक्यता आहे. दुसरीकडे आक्रमक प्रचाराद्वारे मोठी हवा निर्माण केलेल्या “आप”ला मात्र तीन ते दोन अंकी आकडा गाठणंही कठीण आहे. मागच्या 6 वेळा भाजपने गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं, यानंतर आता लागोपाठ 7 व्यांदा गुजरातमध्ये भाजपचं कमळ फुलणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपची पुन्हा एकदा स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजपने 156 जागांवर आघाडी घेतली आहे.

भाजपला 150 पेक्षा जास्त जागांवर यश मिळालं तर गुजरातमधली ही कोणत्याही पक्षाची ही रेकॉर्डब्रेक कामगिरी असेल. यंदाच्या निवडणुकीत भाजपने माधवसिंग सोळंकी यांचा विक्रम मोडण्यासाठी कंबर कसली होती, त्यामध्ये भाजपला यश मिळताना दिसत आहे.

2017 साली काँग्रेसने भाजपला जोरदार टक्कर दिली होती. भाजपला 100 च्या आत रोखण्यात काँग्रेसला यश आलं होतं. 2017 च्या निकालामध्ये भाजपला 99 आणि काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या.

काँग्रेसने गुजरातमध्ये 1962, 1967 आणि 1972 मध्ये पहिल्या तीन विधानसभा निवडणुका जिंकल्या. 1975 मध्ये आणीबाणी लागू झाल्यानंतर लढलेल्या निवडणुकांमध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील पक्षांच्या आघाडीने, काँग्रेसचे बंडखोर नेते चिमणभाई पटेल यांच्या नेतृत्वाखालील जनसंघ आणि किसान मजदूर पक्षाचा पराभव केला. त्यानंतर 1980 आणि 1985 च्या निवडणुका काँग्रेसने जिंकल्या. 1990 च्या निवडणुकीत जनता दल आणि भाजप एक मजबूत शक्ती म्हणून उदयास आले. 1995 नंतर झालेल्या सर्व निवडणुका भाजपने जिंकल्या आहेत.

1985 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने माधवसिंग सोळंकी यांच्या नेतृत्वात 183 पैकी 149 जागांवर विजय मिळवला होता. भाजपलाही आतापर्यंत हे रेकॉर्ड मोडता आलं नव्हतं, यावेळी मात्र माधवसिंग सोळंकी यांचा 149 जागांवरच्या विजयाचा विक्रम भाजपच्या दृष्टीपथात दिसत आहे. 1980 साली गुजरातमध्ये काँग्रेसला 141 आणि 1972 साली 140 जागांवर विजय मिळाला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.