Wednesday, September 28, 2022

सातवी पास युवकाने बनवली अवघ्या 30 हजारात फोर्ड गाडी

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क | पेट्रोल – डिझेलचे वाढते दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलवरील कोणतं जरी वाहन घ्यायचं असेल तर अक्षरक्षा अंगावर काटा येतो नको नको वाटतं त्यात चार चाकी वाहनांच्या किंमती जरी पाहिल्या तरी आपण हातच जोडतो. पण सर्वांना चार चाकी वाहनांची हौस मात्र प्रचंड असते.
अशाच एका सर्वसामान्य माणसाने त्यांच्या कुटुंबासाठी चक्क 30 हजार रुपयांमध्ये फोर्ड गाडी बनविली आहे. त्यामुळे सर्वत्र या युवकांचे कौतुक होत आहे. तसेच आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे.
याआधी सांगलीतील दत्ता लोहार यांनी बनविलेल्या मिनी जिप्सीची प्रचंड चर्चा झाली होती. अशातच आता सांगलीतील अशोक आवटी या दुचाकी आणि ट्रॅक्टर दुरुस्तीचे काम करणाऱ्या मॅकेनिकनी ब्रिटिशकालीन फोर्ड गाडी बनविली आहे.
अशोक आवटी यांनी देखील दत्ता लोहार यांच्याप्रमाणे भंगारातील एमएम आणि रिक्षाचे साहित्य वापरुन जुगाड करत गाडी बनविली आहे. ही गाडी हुबेहूब 1930 सालच्या फोर्ड गाडीसारखी दिसते.
भंगारातील एमएटी गाडीचं इंजिन आणि रिक्षाचे हब आणि यासारखी काही पार्टचा जुगाड करून, लोखंडी पत्रा आणि अँगल पासून ही 1930 ची अशी आलीशान या गाडीसाठी अवघे 30 हजार इतका खर्च आला आहे.
गाडीला एलईडी लाइट आहेत. इंडिकेटर, हॉर्न अशी सेम टू सेम फोर्ड गाडी आहे.या गाडीचे वजन जवळपास 100 किलो इतके आहे आणि 3 ते 4 जण अगदी सहजरीत्या या गाडीने जाऊ शकतात.गाडी 30 किलोमीटर प्रती लीटर असे मायलेज देते.
रिक्षा प्रमाणे ही गाडी किकवर सुरू होते. सध्या ही गाडी पेट्रोलवर चालत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अगदी कमी वयापासून अशोक यांना गाड्या दुरुस्त करण्याचा छंद होता. त्यांनी स्वताचे गॅरेज सुरू केले आणि गाड्या दुरस्त करू लागले. मशीन खोला-खोली करणे हा त्यांचा आवडता होता.
गाड्या खोलने त्यांना मॉडीफाय करणे हे ते नेहमी करत, या गाडीचा पार्ट काढणे असं सुरू होतं. खूप दिवसांपासून स्वताची एखादी गाडी बनवावी असा विचार डोक्यात होता. तब्बल दोन वर्ष मेहनत घेऊन शेवटी ही गाडी तयार झाली.अशोक यांनी 2019 साली लॉक डाऊन झाल्यानंतर यूट्यूबवर विडियो पाहून ही गाडी बनविली.
मुलांना खेळण्यासाठी आणि घरात एक गाडी असावी असं त्याचं स्वप्न होतं आता ते पूर्ण झालं आहे. सध्या या गाडीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

- Advertisement -

हे हि वाचा :

- Advertisement -

- Advertisement -

बेरोजगारी तरुणाई बेजार; भोजन सेवकपदासाठी उच्चशिक्षितांनी केले अर्ज
पीडितेच्या आईमुळेच झाला अवैध गर्भपाताचा पर्दाफाश
टेलिप्रॉम्पटरमध्ये बिघाड; मोदींचा उडाला गोंधळ (व्हिडीओ)

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या