Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्ह्यात ‘सेवादूत प्रकल्पा’द्वारे शासकीय सेवा घरपोच
    जळगाव

    जळगाव जिल्ह्यात ‘सेवादूत प्रकल्पा’द्वारे शासकीय सेवा घरपोच

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 24, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव जिल्ह्यात ‘सेवादूत प्रकल्पा’द्वारे शासकीय सेवा घरपोच

    जळगाव, : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सेवादूत प्रकल्पा’ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा आता थेट घरपोच उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या अभिनव उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांना घेता येणार आहे.

    या योजनेचा मुख्य उद्देश दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच शासकीय कामासाठी प्रत्यक्ष आपले सरकार सेवा केंद्रावर जाणे शक्य नसलेल्या किंवा अर्ज प्रक्रियेबाबत माहिती नसलेल्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळवून देणे हा आहे.

    ‘सेवादूत प्रकल्पा’ अंतर्गत नागरिकांनी https://sewadootjalgaon.in या पोर्टलवर आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे. त्यानंतर संबंधित भागातील आपले सरकार सेवा केंद्रातील केंद्रचालक (सेवादूत) नागरिकांच्या सोयीच्या वेळेनुसार त्यांच्या घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाइन अर्ज भरून देणार आहेत. अर्ज मंजूर झाल्यानंतर संबंधित सेवादूतामार्फत आवश्यक प्रमाणपत्रे नागरिकांना घरपोच वितरित केली जाणार आहेत.

    या सेवेमध्ये महसूल विभागातील उत्पन्न दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जातीचा दाखला आदी प्रमाणपत्रांसह इतर विभागांतील सेवा देखील घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

    सध्या या योजनेअंतर्गत १६० नागरिकांनी घरपोच सेवेचा लाभ घेतला असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घरपोच सेवेसाठी संबंधित आपले सरकार सेवा केंद्रचालक (सेवादूत) यांना नागरिकांनी अतिरिक्त १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

    जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी ‘सेवादूत प्रकल्पा’चा लाभ घेऊन शासकीय सेवांचा सोपा, सुलभ व पारदर्शक अनुभव घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif