लक्ष द्या.. सेट परीक्षा लांबणीवर !

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एमपीएससीच्या परीक्षेमुळे सेट परीक्षा लांबणीवर पडली आहे. एकाच दिवशी राज्यस्तरीय दोन्ही परीक्षा येत असल्याने नियोजनात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार सेट परीक्षा दि. 15 जूनला ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 4 मे रोजी सेट परीक्षा घेण्यात येणार होती. मात्र याच दिवशी एमपीएससीची परीक्षा होणार असल्याने सेट परीक्षा पुढे ढकलली.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतल्या जाणाऱ्या सेट परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. मे महिन्यात 4 तारखेला होणारी परीक्षा आता जून महिन्यात 15 तारखेला आयोजित केली जाणार आहे, विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ.ज्योती भाकरे यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डिसेंबर महिन्यात सेट परीक्षेच्या नियोजना संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले होते. त्यानुसार सेट परीक्षा 4 मे 2025 रोजी आयोजित केले जाणार होती. परंतु विद्यापीठाने संबंधित परिपत्रक रद्द केले असून आता सेट परीक्षा 15 जून रोजी घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक महिना अभ्यास करण्यासाठी मिळणार आहे.

विद्यापीठाच्या सेट विभागाने आतापर्यंत 39 सेट परीक्षा ऑफलाइन पद्धतीने ओएमआर शीट द्वारे घेतल्या आहेत. चाळीसावी सेट परीक्षा सुद्धा ऑफलाइन पद्धतीने जाणार आहे. त्यामुळे परीक्षेच्या तारखेत बदल केला असला तरी परीक्षेच्या पद्धतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही; याची विद्यार्थ्यांनी दखल घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.