Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    • भयंकर! विषारी दारूमुळे ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    ताज्या बातम्या

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 8, 2026No Comments203 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    संस्थाचालकांसह मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करा : अनिल वाघ यांची मागणी

    भडगाव – भाजपचे कार्यकर्ते अनील वाघ यांनी भडगाव येथील विद्यार्थी बेपत्ता प्रकरणासह विविध अनियमिततांबाबत केलेल्या तक्रारीची प्रशासनाने दखल घेतली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी, सहाय्यक आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय यांनी संयुक्तपणे आयुक्त दिव्यांग कल्याण व सक्षमीकरण विभाग, पुणे यांच्याकडे सादर केलेल्या अहवालात शाळेतील अनेक गंभीर त्रुटी व नियमभंग निदर्शनास आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
    अहवालानुसार, चौकशीवेळी मुख्याध्यापक अनुपस्थित होते. शाळेत आवश्यक सुविधा, सीसीटीव्ही व्यवस्था, नोंदी तसेच प्रशासकीय बाबींमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या. तसेच मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यासाठी आदेश व्हावेत अशी मागणी भाजपाचे अनिल वाघ यांनी केली आहे. अनिल वाघ यांनी सांगितले की, विद्यार्थी खरोखरच हरवला आहे की त्याच्यासोबत काही बरे-वाईट घडले आहे, याबाबत अद्याप गंभीर शंका कायम आहे. अशा परिस्थितीत केवळ मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्यावर कारवाई करून हे प्रकरण संपविणे योग्य ठरणार नाही. या शाळेमध्ये अनेक गंभीर त्रुटी असून संपूर्ण संस्थेची निष्पक्ष व सर्वंकष चौकशी होणे आवश्यक आहे. मुख्याध्यापक व अधीक्षक यांच्यासह संस्थाचालक आणि संचालक यांचीही जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. निष्पक्ष चौकशी झाल्यास शासनाची दिशाभूल करून संस्थेमार्फत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचेही समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी मी लवकरच वरिष्ठ स्तरावर करणार आहे. शाळेवर तात्काळ प्रशासक नियुक्त करण्यात यावा आणि दोषी आढळणाऱ्या संबंधित मुख्याध्यापक, अधीक्षक, संस्थाचालक व संचालक यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif