सेरेना विल्यम्सची निवृत्तीची घोषणा…

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना विल्यम्सनं निवृत्तीची घोषणा केली आहे. आगामी अमेरिकन ओपन ही तिच्या कारकीर्दीतली शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा असेल. या स्पर्धेनंतर व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त होणार असल्याचं सेरेनानं आज जाहीर केलं. गेली दोन दशकं तिनं टेनिस विश्वात दबदबा राखला आहे.

आजवर 23 ग्रँड स्लॅम विजेतेपदांवर सेरेनानं आपलं नाव कोरलं आहे. सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतीपदांच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्ट (24) नंतर ती दुसऱ्या स्थानी आहे. तिच्या निवृत्तीनंतर टेनिस मधल्या एका युगाचा अंत होईल असं बोललं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here