जेष्ठ पत्रकार चंदू नेवे यांचे निधन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ज्येष्ठ पत्रकार, अधिवक्ता चंदुलाल नेवे याचे मंगळवार 15 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते दैनिक तरुण भारतचे माजी निवासी संपादक, दैनिक लोकमतचे माजी वरिष्ठ उपसंपादक होते.

चंदुलाल नेवे हे कुटुंबासह उत्तर भारताच्या दौऱ्यावर गेले होते. मंगळवारी रात्री त्यांनी अयोध्येत अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव 17 नोव्हेंबर गुरुवारी जळगावात पोहचल्यानंतर त्यांचे अंतिम संस्कार केले जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.