Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»क्रीडा»स्क्वॅश स्पर्धेसाठी जिल्हा संघाची २१ जून रोजी निवड चाचणी
    क्रीडा

    स्क्वॅश स्पर्धेसाठी जिल्हा संघाची २१ जून रोजी निवड चाचणी

    एकलव्य क्रीडा संकुलात होणार आयोजन : उपस्थितीचे आवाहन
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 19, 2026No Comments27 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    द महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने राज्यस्तरीय आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिप – २०२६ चे आयोजन दिनांक १ ते ६ जुलै २०२६ या कालावधीत महाराष्ट्र स्क्वॅश अकॅडमी, एन.आय.बी.एम. रोड, उंड्री, पुणे येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड करण्याकरिता जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश असोसिएशन व एकलव्य क्रीडा संकुल, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक २१ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता सर्व वयोगटाकरिता निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

    या निवड चाचणीत उत्कृष्ट कामगिरी करणारे व प्राविण्यप्राप्त खेळाडूंची राज्यस्तरीय आंतरजिल्हा स्क्वॅश चॅम्पियनशिपसाठी जळगाव जिल्हा संघात निवड करण्यात येणार आहे. सदर स्पर्धा मुले व मुलींसाठी अनुक्रमे ११ वर्षांखालील, १३ वर्षांखालील, १५ वर्षांखालील, १७ वर्षांखालील, १९ वर्षांखालील, तसेच पुरुष व महिला खुला गट, ३५ वर्षांवरील आणि ४५ वर्षांवरील गटांमध्ये होणार आहे.

    जिल्ह्यातील सर्व स्क्वॉश खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी होऊन राज्यस्तरीय स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवावी, असे आवाहन जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश असोसिएशनचे अध्यक्ष यांनी केले आहे. निवड चाचणी व नोंदणीसंदर्भातील अधिक माहितीसाठी इच्छुक खेळाडूंनी जळगाव जिल्हा हौशी स्क्वॅश असोसिएशनचे अध्यक्ष श्री. हर्षल चौधरी (९८९०९२३४०५), सचिव डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर (९८६०२६५३७३), सहसचिव डॉ. रणजीत पाटील (८६००८३९१२६) यांचेशी तसेच एकलव्य स्क्वॉश अकॅडमी, क्रीडा संकुल, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026

    भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif