
मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:
तालुक्यातील जांभुळधाबा येथील शेतकरीपुत्र वैभव शिंबरे (२२), वैभव मोरे (२२), राहूल बिलावर (२०) यांची ‘अग्निवीर’ योजनेअंतर्गत भारतीय सैन्यदलात भरती प्रक्रियेत निवड झाली आहे. विशेष म्हणजे एकाच गावातील तीन युवकांची एकाच वेळी भरती झाल्याबद्दल तरुणांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजी, तसेच पेढे वाटून आनंदत्सोव साजरा करण्यात आला.
या यशाबद्दल तिन्ही युवकांनी आपले श्रेय आई वडिल आपले शिक्षक मंडळींना दिले आहे. त्यांच्या यशाबद्दल गावभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील ग्रामस्थांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. चैनसुख संचेती यांनी मिरवणूक दरम्यान भेट दिली असता त्यांचा सत्कार केला.

