चंद्रपूर
येथील बल्लारपूर शहरातील हद्दीत एका युवकाकडून स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलिसांनी 9 सप्टेंबर ला धारदार अशी टोकदार तलवार जप्त केली आहे. या प्रकरणी सदरील तरुणावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेत जेरबंद करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना 9 सप्टेंबर गोपनिय माहिती मिळाली त्यावरुन पोलिसांनी सापळा रचला घरी जाऊन छापा टाकला घर झडती मध्ये एक धारदार व टोकदार लोखंडाची तलवार मिळून आली असता ती जप्त करुन तरुणावर बल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक मूमक्का सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंदू यांचा मार्गदर्शनात पोलिस स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर निरीक्षक महेश कोंडावार यांचा नेतृत्वात, पो. उपनिरीक्षक विनोद भूरले, नितेश महात्मे, गोपिनाथ नरोटे, अमोल सावे, प्रफुल मारघाटे, सर्व गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली.