Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»शैक्षणिक»मार्क किती मिळतात त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता हे पाहा
    शैक्षणिक

    मार्क किती मिळतात त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता हे पाहा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 10, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    सध्या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक निर्माण झालेली आहे. पेपरमुळे विद्यार्थी परीक्षेचं टेन्शन घेतानाही दिसत आहेत. आज देशभरातील या विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. तुम्ही परीक्षेचं टेन्शन घेऊ नका. इतर विद्यार्थ्यांना किती मार्क मिळतात त्याकडे पाहू नका. तुम्ही काय करू शकता हे पाहा, असं सांगतानाच ज्या विषयाची भीती वाटते, त्या विषयाची आधी तयारी करा, असा कानमंत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांची सर्व स्वप्ने आणि उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून मदत केली. तसेच विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीनेही मोदींनी त्यांच्याशी भाष्य केले. हा कार्यक्रम दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी देशभरातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सहभागी झाले होते. आजच्या कार्यक्रमासाठी ३.३० कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आणि २०.७१ पेक्षा जास्त शिक्षकांनी नोंदणी केली होती. यातील निवडक २५०० जणांनी प्रत्यक्ष या कार्यक्रमात भाग घेतला.

    पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कानमंत्र देतानाच नेतृत्व गुण कसे विकसित करायचे हे सुद्धा सांगितलं. लीडरला टीम वर्क शिकणं महत्त्वाचं आहे. कुणाला काम दिलं असेल तर त्यातील अडचणी समजून घेतल्या पाहिजे. जिथे कमी, तिथे आम्ही हा सिद्धांत तुम्ही मनात बिंबवून ठेवा. लोकांचा विश्वासच तुमच्या लीडरशीपला मान्यता देईल, असं मोदी म्हणाले.

    यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आव्हानांना सामोरे जाण्याचाही कानमंत्र दिला. तुम्हाला तुमच्यातील आव्हानांचा सामना करावा लागेल. मागच्यावेळी तुम्हाला 30 मार्क होते, तर तुम्हाला यावेळी 35 मार्क मिळवण्याचा प्रयत्ने केला पाहिजे. असं करून तुम्ही तुमचं टार्गेट वाढवलं पाहिजे. हे तुमच्यासाठी एक आव्हान आहे आणि तुम्हाला त्याच्याशी लढलं पाहिजे, असं मोदी म्हणाले.

    यावेळी एका विद्यार्थ्याने परीक्षा जवळ आल्यावर वेळेचे नियोजन आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी? असा प्रश्न विचारला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर उत्तर दिले. “वेळेचे योग्य नियोजन केले पाहिजे. मिळालेल्या वेळेचा चांगला उपयोग करता आला पाहिजे. दुसऱ्या दिवसाचे नियोजन करावे. विनाकारण वेळ घालवू नका. गप्पांमध्ये किंवा इतर विषयांवर बोलण्यापेक्षा परीक्षेवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. अभ्यासाची तयारी करताना व्यवस्थित जेवण करा. पुरेशी झोप घ्यायला पाहिजे”, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला.

    #student Advice Exam Exam Pay Talk Mark Narendra Modi Prime Minister Study tension
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिल्ली हॉटेलच्या आगीत संपूर्ण कुटुंब उध्वस्त

    June 4, 2026

    ठरले! ‘या’ तारखेला कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन

    June 4, 2026

    राजधानी दिल्ली हादरली : हॉटेलमध्ये मृत्यूचे तांडव!

    June 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif