Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»शैक्षणिक»जिल्हा परिषद शाळेची सुरक्षा वाऱ्यावर
    शैक्षणिक

    जिल्हा परिषद शाळेची सुरक्षा वाऱ्यावर

    संरक्षक भिंत नाही, गेट नाही : शाळा आवारात थेट सापांचा वावर
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 22, 2026Updated:June 22, 2026No Comments141 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क

    रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, सुरक्षेच्या अभावी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि जीवन धोक्यात आले आहे. शाळेला संरक्षक भिंत आणि प्रवेशद्वार (गेट) नसल्याने शाळा परिसराचा वापर चक्क सार्वजनिक रस्त्यासारखा केला जात आहे, ज्यामुळे शाळेचे शैक्षणिक वातावरण गढूळ झाले आहे.

    शाळेला कुंपण नसल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थ शाळेच्या प्रांगणातूनच आपली वाहने आणि गुरेढोरे घेऊन जात आहेत. यामुळे शाळा परिसराचे रूपांतर एका मोकळ्या रस्त्यासारखे झाले आहे. मोकाट फिरणारी जनावरे थेट वर्गापर्यंत पोहोचत असल्याने शैक्षणिक साहित्याचे नुकसान होत आहे. तसेच, शाळेच्या आवारात बिनदिक्कतपणे होणाऱ्या या वर्दळीमुळे विद्यार्थ्यांच्या, विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

    जिल्हा परिषद शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत असले तरी, पायाभूत सुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शाळेच्या वर्गखोल्यांच्या छताला वॉटरप्रूफिंग नसल्यामुळे पावसाळ्यात पाणी झिरपत आहे. छताला पडलेल्या भेगांमुळे पावसाचे पाणी थेट वर्गात येत असल्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणे नादुरुस्त होत आहेत, तर शॉर्टसर्किटचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात वर्गात बसणेही मुलांना कठीण झाले आहे.

    शाळेतील फरशा खालून पोकळ झाल्यामुळे तिथे सापांनी आणि घुशींनी आपले बस्तान मांडले आहे. मागील काही दिवसांत अशा प्रकारे सापांचे दर्शन झाल्याने पालकांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेबाबत भीतीचे वातावरण पसरले आहे. शाळेला सुरक्षित कंपाउंड नसल्याने गावकरी शाळेतील स्वच्छतागृहांचा वापर करत आहेत.

    परिणामी, येथे प्रचंड अस्वच्छता पसरली असून ती नाममात्र उरली आहेत. पर्यावरण संवर्धनाचे धडे शाळेत गिरवले जातात, परंतु शाळा परिसरच असुरक्षित असल्याने या शिक्षणाचा उपयोग काय, असा संतप्त सवाल पालक उपस्थित करत आहेत. शाळेची संरक्षक भिंत तातडीने बांधून, गेट बसवावे आणि वर्गखोल्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीकडून केली जात आहे. प्रशासन याकडे कधी लक्ष देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif