Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अध्यात्म»आषाढीनिमित्त संत मुक्ताईंच्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर
    अध्यात्म

    आषाढीनिमित्त संत मुक्ताईंच्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर

    कोथळी, नवीन मुक्ताई मंदिर भक्तिमय : मंत्री आदिती तटकरे यांनी घेतले दर्शन, संतांची आकर्षक रांगोळी ठरली भाविकांचे आकर्षण
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 26, 2026Updated:July 26, 2026No Comments84 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    आषाढी एकादशीनिमित्त संत मुक्ताई मूळ मंदिर, कोथळी तसेच मुक्ताईनगर शहरातील नवीन मुक्ताई मंदिर येथे मुक्ताईनगर तालुक्यासह विदर्भ आणि मध्य प्रदेशातील हजारो वारकरी व भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पंढरपूरच्या आषाढी वारीला जाऊ न शकणारे अनेक भाविक या दिवशी संत मुक्ताईंच्या दर्शनासाठी कोथळी व नवीन मंदिरात येत असल्याने दोन्ही मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.

    कोथळी येथील संत मुक्ताई मूळ मंदिरात पहाटे अभिषेक महापूजा पार पडली. त्यानंतर दिवसभर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मंदिरात आलेल्या भाविकांसाठी सुमारे दीड क्विंटल साबुदाणा खिचडीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. हा फराळ बाबुराव ठाकरे, योगेश चोपडे आणि राजेंद्र पानकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.

    आषाढी एकादशीनिमित्त महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सकाळी संत मुक्ताईंचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या वतीने मंदिराचे व्यवस्थापक उद्धव महाराज जुनारे यांनी त्यांचा श्रीफळ व मुक्ताई चरित्र ग्रंथ भेट देऊन सत्कार केला.

    मुक्ताईनगर शहरातील नवीन मुक्ताई मंदिरातही भाविकांची दिवसभर मोठी गर्दी होती. येथे वैकुंठवासी लक्ष्मण बळीराम चौधरी यांच्या स्मरणार्थ मनोज चौधरी यांच्या वतीने तब्बल चार क्विंटल साबुदाणा खिचडीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

    दरम्यान, कोथळी येथील मूळ मंदिरात रांगोळी कलाकार देवा रावणचवरे यांनी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध संतांची आकर्षक रांगोळी साकारली होती. या कलाकृतीने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. रांगोळी पाहण्यासाठी दिवसभर भाविकांची मोठी गर्दी होत असून अनेकांनी या कलाकृतीचे कौतुक केले.

    आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संत मुक्ताईंच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. दर्शन, पूजा-अर्चा, महाप्रसाद, संतांच्या नामस्मरण आणि भक्तिमय वातावरणामुळे कोथळी व नवीन मुक्ताई मंदिर परिसरात दिवसभर उत्साहाचे आणि अध्यात्मिक आनंदाचे वातावरण अनुभवायला मिळाले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    चिनावलच्या तरूणाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif