भुसावळ – शहरात भंगार चोरीच्या वादातून दोन खुनांच्या घटना ताज्या असतानाच रेल्वे कॉलनीत भंगार चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या चोरट्याने धुणी-भांडी करणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून भंगार चोरट्यांचा मुद्दा पुन्हा नव्याने समोर आला आहे.
रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गोदावरी कॉलनीत आर.बी.2, 903 अ मध्ये तक्रादार सुनीता कुमारी अमर कुमार (28, भुसावळ) या गुरुवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास धुणी-भांडी करीत असताना अज्ञात संशयीत घराच्या छतावरून दाखल झाला. यावेळी सुनीता कुमारी यांनी जोर-जोरात आरडा-ओरड केल्यानंतर आरोपीने महिलेने गुपचूप बसावे म्हणून धारदार वस्तूने हल्ला केला व आरोपीने पलायन केले. महिलेवर उपचार करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल लोकेश तडवी करीत आहेत.
Trending
- ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
- नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
- जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
- अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
- वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
- दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
- बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
- प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!

