शेताजवळ स्कुटी लावली, विहिरीच्या काठावर बॅग; अन…

आई रागावली म्हणून २१ वर्षीय तरुणीची विहिरीत उडी

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

एका २१ वर्षीय तरुणीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना अकोल्यातल्या मुर्तीजापुर तालुक्यातून समोर आली आहे. सकाळी कामावर जाण्यासाठी निघाली असता रस्त्यातच मुलीने आपली गाडी उभी केली. यानंतर तिने विहरीत उडी मारून जीवन संपविले. आईने सकाळी रागावल्यातून मुलीने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी अधिक तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस करत आहेत.

अकोल्यातल्या मुर्तीजापुर तालुक्यातल्या ग्राम शिरपूर- शिरसो रस्त्यावर एका शेतातील विहिरीत या तरुणीचा मृतदेह आढळून आला. नम्रता विनोद गरदे (वय २१) असं या आत्महत्या केलेल्या तरुणीच नाव आहे. मुर्तीजापुर गावातील विनोद गरदे आणि कांचन गरदे यांची नम्रता ही मुलगी असून एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करत होती.

नम्रता रोजप्रमाणे हॉस्पिटलमध्ये कामावर गेली होती. मात्र रात्री ९ वाजल्यानंतर देखील ती घरी परतली नाही. यामुळे तिच्या आईने शोध सुरू केला. तिने भाऊ सतीश भगत यांच्याशी फोनवरुन संपर्क साधत नम्रता तुमच्याकडे आली का? म्हणून विचारणा केली. मात्र नम्रता तेथेही नव्हती. मैत्रिणीकडे शोध घेतला असता कुटुंबीयांना तिचा सुगावा लागला नाही. दरम्यान सकाळी तिला आईनं रागावल्याचेही भावाला सांगितले होते. ती नाराज झाली असेल आणि मैत्रिणीकडे गेली असेल असे कुटूंबियांना वाटले.

याचा दरम्यान नम्रताची स्कुटी हिरपूर- सिरसो रस्त्यावरील त्यांच्या शेताजवळ उभी असल्याची माहिती पुढे आली होती. तर शेतातील विहिरीच्या काठावर एक बॅग देखील ठेवल्याचे दिसून आले. याठिकाणी ग्रामस्थांनी धाव घेतली. विहिरीत मुलीचा मृतदेह दिसल्यानंतर बाहेर काढण्यात आला. कपडे व पायातील बुटावरुन मृतदेह नम्रता गरदे हिचा असल्याची खात्री पटली. त्यानंतर उपस्थित लोकांच्या सहकार्याने पोलिसांनी तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.