Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»स्कुटीची डंपरला धडक : दोघांचा मृत्यू
    अपघात

    स्कुटीची डंपरला धडक : दोघांचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 30, 2026No Comments390 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    अमळनेर

    गलवाडे रस्त्यावर धावत्या स्कुटीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची भीषण घटना रविवारी, ३० रोजी दुपारी साडेएक वाजेच्या सुमारास पेट्रोल पंपाजवळ घडली. पंडित धाकू भिल (वय ५०) आणि नागो अमृत सपकाळे (वय ४५), दोघेही रा. रंजाणे, ता. जामनेर, अशी मृतांची नावे आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, पंडित भिल व नागो सपकाळे हे दोघे स्कुटी क्रमांक एमएच ५४ ई ७६४ वरून गलवाडे येथे भंडारा प्रसादाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. पंडित भिल स्कुटी चालवत होते, तर नागो सपकाळे मागे बसले होते. कार्यक्रम आटोपून दोघे गलवाडेहून परतत असताना पेट्रोल पंपाजवळ स्कुटीवरील नियंत्रण सुटले. यावेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपर क्रमांक एमएच १८ एम ७८५७ वर स्कुटी जोरदार आदळली. धडक इतकी भीषण होती की पंडित भिल यांना गंभीर दुखापत झाली, तर नागो सपकाळे यांनाही जोरदार मार लागला. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

    घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, वाहतूक पोलीस संजय बोरसे, विनय पाटील, मयूर पाटील, गणेश पाटील आणि अविनाश भदाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेमुळे रंजाणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026

    विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif